शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

आर्थिक मंदीच्या नियंत्रणाचा ‘समन्वय’ कसा साधणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 20:26 IST

सद्यस्थितीत देश आर्थिक मंदीच्या सावटाखाली असून या पार्श्वभूमीवर शनिवार ७ सप्टेंबरपासून राजस्थानमधील पुष्कर येथे संघ तसेच भाजपाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे.

ठळक मुद्दे७ सप्टेंबरपासून संघ-भाजपा समन्वय बैठक : संघ परिवारातील सर्व संघटनांचा समावेश

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सद्यस्थितीत देश आर्थिक मंदीच्या सावटाखाली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातील काही संघटनांकडून केंद्र शासनाबाबत नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शनिवार ७ सप्टेंबरपासून राजस्थानमधील पुष्कर येथे संघ तसेच भाजपाची समन्वय बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघ परिवारातील सर्व संघटना समाविष्ट होणार आहेत. या बैठकीत आतापर्यंतच्या कामगिरीचा आढावा घेण्यासोबतच पुढील नियोजनावरदेखील सखोल मंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरवर्षी नियमितपणे तीन ते चार वेळा अशी बैठक आयोजित करण्यात येते. तरी यंदा जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविणे, ‘एनआरसी’ मुद्दा व त्यातच मंदीवरुन तापलेले राजकारण यामुळे या बैठकीला महत्त्व आले आहे.या बैठकीत संघाशी जुळलेल्या विश्व हिंदू परिषद, स्वदेशी जागरण मंच, अखिल भारतीय शिक्षण मंडळ,सेवा भारती, भारतीय मजदूर संघ यांच्यासह एकूण ३६ संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होतील. शिवाय भाजपाचेदेखील प्रतिनिधी राहतील. ७ सप्टेंबर ते ९ सप्टेंबर या कालावधीत होणाऱ्या या बैठकीला सरसंघचालक डॉ.मोहन भागवत, सरकार्यवाह भय्याजी जोशी, सहसरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे यांच्यासह भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा, राष्ट्रीय महामंत्री बी. एल. संतोष यांच्यासह काही केंद्रीय मंत्रीदेखील उपस्थित राहतील. या बैठकीत प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कृषी, पर्यावरण, जलसंवर्धन या मुद्यांवर मंथन होईल. शिवाय देशाच्या आर्थिक स्थितीवर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत संघाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी या स्थितीवर आपली बाजू मांडतील. शिवाय केंद्र शासनाशी समन्वय आणखी प्रभावी पद्धतीने कसा वाढीस लागेल यावरदेखील चर्चा होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.उद्योगांमधील मंदीवरून ‘भामसं’ आक्रमकऑटोमोबाईल क्षेत्रातील मंदीचा फटका अर्थव्यवस्थेला बसत असून उद्योगांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित भारतीय मजदूर संघाने या मुद्यावरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. केंद्राची आर्थिक धोरणं सपशेल अपयशी ठरली असून खासगीकरणाचा आग्रह भोवतो आहे. देशातील खासगीकरण बंद करुन ‘नीती’ आयोगाचे पुनर्गठन करण्याची मागणी ‘भामसं’तर्फे करण्यात आली आहे. मागील महिन्यात दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत यावर चर्चादेखील झाली होती.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा