शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

सख्खे भाऊ-बहीण वेगवेगळ्या जातीचे कशे असू शकतात? जात पडताळणी समितीला हाय कोर्टाचा सवाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 11:17 IST

Nagpur : अपयश जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे, खापर अर्जदारावर

राकेश घानोडे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सख्खे भाऊ-बहीण वेगवेगळ्या जातीचे असू शकत नाही, हे कोणीही डोळे बंद करून सांगू शकेल. परंतु, ही साधी गोष्ट अमरावती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीला समजली नाही. या समितीने भावाकडे विमुक्त जातीचे वैधता प्रमाणपत्र असताना बहिणीला समान जातवैधता प्रमाणपत्र जारी करण्यास नकार दिला. या निर्णयाचे काय परिणाम होतील, याचादेखील विचार केला नाही. त्यामुळे समितीला मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाचा दणका बसला.

पीडित बहीण सीमा तवर यांचे भाऊ विशालसिंग तवर यांना २५ सप्टेंबर २००१ रोजी 'राजपूत भामटा- विमुक्त जाती (अ)'चे वैधता प्रमाणपत्र जारी झाले आहे. सीमा यांनी समितीकडे दावा दाखल करून समान जातवैधता प्रमाणपत्र मागितले होते. परंतु, समितीने ६ जून २०१७ रोजी सीमा यांचा दावा नामंजूर केला. विशालसिंग यांच्या जातवैधता प्रमाणपत्राचा रेकॉर्ड उपलब्ध झाला नाही असे निर्णय देताना नमूद करण्यात आली. त्यामुळे सीमा यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. 

समितीचा वादग्रस्त निर्णय रद्द न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व वृषाली जोशी यांनी जात समितीच्या भोंगळ कारभारावर कडक ताशेरे ओढले. 'समितीचा हा कुठला न्याय होय' असे न्यायालय म्हणाले. समितीचा वादग्रस्त निर्णय रद्द करून सीमा यांना ४ फेब्रुवारीपर्यंत 'राजपूत भामटा- विमुक्त जाती (अ)'चे वैधता प्रमाणपत्र जारी करा, असा आदेश दिला.

१६ मधील स्पष्टीकरण जात प्रमाणपत्र नियम १६ मधील स्पष्टीकरण ३ अनुसार, रक्ताच्या नात्यातील एका व्यक्तीकडे जात वैधता प्रमाणपत्र असल्यास आणि त्या प्रमाणपत्रासंदर्भात कोणताही वाद नसल्यास दुसऱ्या व्यक्तीला समान प्रमाणपत्र नाकारले जाऊ शकत नाही. याकडे सीमा यांचे वकील अॅड. शैलेश नारनवरे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधून पडताळणी समितीने या नियमाला केराची टोपली दाखविल्याचा मुद्दा मांडला. उच्च न्यायालयाला या मुद्यामध्ये तथ्य आढळून आले.

अपयश जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे, खापर अर्जदारावर विशालसिंग यांच्या जातवैधता प्रमाणपत्राचा रेकॉर्ड उपलब्ध झाला नाही, हे पडताळणी समितीचे अपयश आहे. समितीला त्याचे खापर सीमा यांच्यावर फोडता येणार नाही. याशिवाय, विशालसिंग यांचे जातवैधता प्रमाणपत्र अवैध असल्याचे समितीचे म्हणणे नाही. त्यांचे प्रमाणपत्र कायम आहे. या परिस्थितीत सीमा यांना वैधता प्रमाणपत्र नाकारले जाऊ शकत नाही. याकरिता, त्यांना इतर पुरावे देण्याचीही गरज नाही, असेदेखील उच्च न्यायालयाने नमूद केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर