रिपाइंचे प्रकाश कुंभे यांच्या घरावर हल्ला

By Admin | Updated: February 15, 2017 03:18 IST2017-02-15T03:18:36+5:302017-02-15T03:18:36+5:30

रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियााचे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या घरावर काही अज्ञात असामाजिक तत्त्वाच्या लोकांनी हल्ला केला.

The house of RPI Prakash Kunkhe attacked the house | रिपाइंचे प्रकाश कुंभे यांच्या घरावर हल्ला

रिपाइंचे प्रकाश कुंभे यांच्या घरावर हल्ला

 अंगणात ठेवलेल्या कारची तोडफोड
नागपूर : रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियााचे नागपूर प्रदेश अध्यक्ष प्रकाश कुंभे यांच्या घरावर काही अज्ञात असामाजिक तत्त्वाच्या लोकांनी हल्ला केला. त्यांना शिवीगाळ करीत अंगणात ठेवलेल्या कारची तोडफोड केली. ही घटना सोमवारी मध्यरात्री वकीलपेठ येथे घडली.
प्रकाश कुंभे हे श्री आयुर्वेद महाविद्यालयासमोर वकीलपेठ येथे राहतात. सोमवारी रात्री १ वाजताच्या सुमारास काही अज्ञात लोक त्यांच्या घरासमोर येऊन मोठमोठ्याने त्यांना अश्लील शिवीगाळ करू लागले. आवाज ऐकून कुंभे त्यांची पत्नी व मुलींना जाग आली. काही अनर्थ होण्याच्या भीतीने त्यांनी दार न उघडता खिडकीतून डोकावून पाहिले. तेव्हा काही अज्ञात लोक त्यांना शिवीगाळ करीत असल्याचे दिसून आले. ते नशेत होते. काही वेळानंतर एका व्यक्तीने मोठा दगड उचलून अंगणात उभ्या असलेल्या त्यांच्या वॅगनार कारवर (एमएच ४९-बी-४७०९ ) यावर जोरात आदळला. यात त्यांच्या कारचे काच फुटले.
यानंतर शिवीगाळ करीत ते फरार झाले. या घटनेमुळे कुंभे कुटुंबीय घाबरले आहेत. कुंभे यांनी इमामवाडा पोलीस स्टेशनला या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The house of RPI Prakash Kunkhe attacked the house