शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

हॉटेलमधील देह व्यापाराच्या अड्ड्यावर धाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 22:48 IST

कामठीमधील रनाळा येथील लॉजमध्ये सुरूअसलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीला अटक केली. झोन पाचच्या पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या तावडीतून अल्पवयीनसह एका तरुणीची मुक्तता करण्यात आली.

ठळक मुद्देसूत्रधारासह तिघांना अटक : नागपूरनजीकच्या कामठी रनाळा येथील येथील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कामठीमधील रनाळा येथील लॉजमध्ये सुरूअसलेल्या देह व्यापाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकून तीन आरोपीला अटक केली. झोन पाचच्या पोलीस दलातर्फे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत आरोपीच्या तावडीतून अल्पवयीनसह एका तरुणीची मुक्तता करण्यात आली. सय्यद सरफराज ऊर्फ सोनू अली सय्यद आसिफ अली (२७) रा. इतवारी स्टेशन, मोंटू बाबुराव ठाकूर (३१) रा. कोहिनूर लॉनजवळ वाठोडा आणि अभिषेक रमेश पाटील (३१) रा. कामठी अशी आरोपीची नावे आहे.झोन पाचच्या पोलीस दलाला सोनू आणि मोंटू हे देहव्यापार करीत असल्याची माहिती मिळाली. ते दोघे मंगळवारी सायंकाळी रनाळा येथील हॉटेल रिलॅक्स लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंगमध्ये देहव्यापारासाठी येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला. या अड्ड्याचा सूत्रधार मोंटू आहे. तर सोनू ऑटोचालक आहे. सोनूने ऑटोमध्ये एक तरुणी आणि १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला आणले. त्याने दीड हजार रुपयात डमी ग्राहकासोबत सौदा केला. त्या ग्राहकाकडून हॉटेलच्या मॅनेजरने खोलीच्या भाड्याचे एक हजार रुपये घेतले. कुठल्याही दस्तावेजाची पाहणी न करता हॉटेलची खोली उपलब्ध करून दिली. डमी ग्राहकाचा इशारा मिळताच पोलिसांनी धाड टाकून तिघांनाही अटक केली. ऑटोमध्ये बसलेल्या मुलीची विचारपूस केली असता ती अल्पवयीन असल्याचे उघडकीस आले. तर देहव्यापार करीत असलेली तरुणी विवाहित आहे. ती तीन वर्षांपासून या धंद्यात आहे.सोनू-मोंटू अनेक वर्षांपासून देहव्यापाराचा अड्डा चालवतात. ग्राहकाकडून वसूल करण्यात आलेली रकम पीडित आणि सोनू-मोंटू बरोबरीत वाटून घेतात. अल्पवयीन मुलीच्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. आई मजुरी करते. आर्थिक परिस्थिती बरोबर नसल्यामुळे अल्पवयीन मुलीने शाळा सोडली. आरोपींनी पैशाचे आमिष दाखवून तिला आपल्या टोळीत सामील करून घेतले. ती दोन महिन्यापासून आरोपींशी जुळली आहे. आरोपींविरुद्ध अनैतिक देह व्यापार विरोधी कायदा (पीटा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई झोन पाचचे डीसीपी हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक बापू ढोरे, एपीआय ओमप्रकाश सोनटक्के, पीएसआय जितेंद्र ठाकूर, कर्मचारी राजकुमार जनबंधू, महेश बावणे, सूरज भारती, दिनेश यादव, प्रभाकर मानकर, मृदुल नगरे, रवींद्र राऊत आणि सुजाता यांनी केली.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटraidधाड