हॉटेल अशोकने कोविड रुग्णांसाठी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:07 IST2021-04-16T04:07:54+5:302021-04-16T04:07:54+5:30
फोटो आहे... वाणिज्य पट्टा .. ८ बाय २ .. नागपूर : लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोकचे संजय गुप्ता यांनी काटोल ...

हॉटेल अशोकने कोविड रुग्णांसाठी
फोटो आहे... वाणिज्य पट्टा .. ८ बाय २ ..
नागपूर : लक्ष्मीनगर येथील हॉटेल अशोकचे संजय गुप्ता यांनी काटोल तहसील येथील कोविड रुग्णांच्या वाहतूक सुविधेसाठी वातानुकूलित अॅम्ब्युलन्स दान दिली आहे. अॅम्ब्युलन्सचे संचालन श्री नवदुर्गा प्रदर्शनी मंडळातर्फे करण्यात येणार आहे. लायन्स क्लब ऑफ नागपूरतर्फे ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार आणि भरतीसाठी मार्गदर्शन करण्यात येत आहे. अॅम्ब्युलन्स खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते दान देण्यात आली. यावेळी राजू बिसानी, सुकुमार घोडे, भारत पटेल, राजू डंभाले, पिंटू बसानी, बालू घोडे, अयूब पठाण, विजय केला, राजेश गुप्ता, तुषार घोडे आणि काटोल येथील अनेक व्यावसायिक उपस्थित होते. संजय गुप्ता आणि त्यांचे कुटुंब मोठ्या प्रमाणात निरंतर विविध सामाजिक आणि धार्मिक संस्थांना देणगी देत आहेत. कुटुंबात जन्मदिवस वा लग्नाचा वाढदिवस असताना गुप्ता यांच्यातर्फे वृद्धाश्रम, शैक्षणिक संस्था, वैद्यकीय संस्थांना मदत करण्यात येते. त्यांनी अयोध्येत श्रीराम मंदिर बांधण्यासाठी देणगी दिली आहे. (वा.प्र.)