लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनोरुग्णांच्या खरुज लागणची अखेर प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली. शुक्रवारी अशा रुग्णांची डॉक्टर व परिचारिकांनी तपासणी करून आवश्यक मलम लावला. सोबतच रुग्णांचे कपडे गरम पाण्यात टाकून नंतरच धुण्यासाठी पाठविले. शनिवारपासून रुग्णालयाच्या परिसरात वाढलेले गवत व झुडूप कापण्याचे कामही सुरू होणार आहे. ‘लोकमत’ने ‘मनोरुग्णालयात खरुजची साथ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.मनोरुग्णालयातील रुग्णांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष झाले होते. यातूनच सुमारे ८० टक्के रुग्णांना खरुजची लागण झाली. रुग्णाच्या नातेवाईक व काही कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक रुग्ण आठवड्यातून एक-दोनदाच अंघोळ करीत होते. कपड्यातच घाण करणाºया रुग्णांकडे लक्ष दिले जात नव्हते. पूर्वी सफाई कर्मचारी अशा रुग्णांची स्वच्छता करून द्यायचे. आता सफाईचे कंत्राट बदलल्याने याकडे दुर्लक्ष होत होते. रुग्णांचे कपडे धुणारा कंत्राटदारही योग्य पद्धतीने कपडे धूत नसल्याच्याही तक्रारी होत्या. रुग्णांच्या बोटांमध्ये, मनगट, कोपर, बगलेचा भाग, नाभी, मांड्या आदी ठिकाणी खरुज झाली. वारंवार खाजवल्यामुळे त्या फुटून जखमा झालेले, पू येणारे रुग्णही दिसून येत होते. याचे सविस्तर वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. वृत्ताची दखल दुसºयाच दिवशी म्हणजे शुक्रवारी घेण्यात आली. प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी परिपत्रक काढून डॉक्टर व परिचारिकांना तातडीने अशा रुग्णांना मलम लावण्याच्या व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. सोबतच रुग्णांचे कपडे गरम पाण्यात टाकून नंतरच ते धुण्यासाठी पाठविण्याचाही सूचना दिल्या. रुग्णालयाच्या परिसरात वाढलेले गवत व झुडूप कापण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
खरुजच्या नियंत्रणासाठी रुग्णालयाचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2018 22:59 IST
मनोरुग्णांच्या खरुज लागणची अखेर प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाने गंभीर दखल घेतली. शुक्रवारी अशा रुग्णांची डॉक्टर व परिचारिकांनी तपासणी करून आवश्यक मलम लावला. सोबतच रुग्णांचे कपडे गरम पाण्यात टाकून नंतरच धुण्यासाठी पाठविले. शनिवारपासून रुग्णालयाच्या परिसरात वाढलेले गवत व झुडूप कापण्याचे कामही सुरू होणार आहे. ‘लोकमत’ने ‘मनोरुग्णालयात खरुजची साथ’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची तातडीने दखल घेण्यात आल्याने रुग्णांना मोठा दिलासा मिळाला.
खरुजच्या नियंत्रणासाठी रुग्णालयाचा पुढाकार
ठळक मुद्देप्रादेशिक मनोरुग्णालय : रुग्णांना लावला मलम, स्वच्छतेकडे लक्ष देण्याच्या दिल्या सूचनालोकमतचा प्रभाव