ंभदंत सुरेई ससाई यांचे रुग्णालयातील बिल अजूनही थकीत
By Admin | Updated: December 19, 2015 02:42 IST2015-12-19T02:42:48+5:302015-12-19T02:42:48+5:30
दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यावरील रुग्णालयाचे बिल अजूनही थकीत आहे, ...

ंभदंत सुरेई ससाई यांचे रुग्णालयातील बिल अजूनही थकीत
नागपूर : दीक्षाभूमी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध धम्मगुरु भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्यावरील रुग्णालयाचे बिल अजूनही थकीत आहे, याकडे आमदार डॉ. मिलिंद माने यांनी शुक्रवारी विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले. डॉ. मिलिंद माने यांनी औचित्याचा मुद्याद्वारा याकडे शासनाचे लक्ष वेधत सांगितले की, भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांना १८ जुलै २०१४ रोजी केअर रुग्णालय येथे अत्यवस्थेत भरती करण्यात आले होते. त्यावेळेस देशविदेशातील बौद्ध बांधव चिंतित होते. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या होत्या. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व तत्कालीन पालकमंत्री नितीन राऊत यांनी सुद्धा भदंत ससाई यांची भेट घेतली होती. त्यावेळी भंतेजींच्या रुग्णालयाचा खर्च महाराष्ट्र राज्य सरकार देईल, असे आश्वासन भदंत ससाई आणि रुग्णालय व्यवस्थापनाला दिले होते. त्यानंतर पाच महिन्याचा कालावधी त्यांच्याकडे उपलब्ध असतांना देखील या रुग्णालयाचे ५ लक्ष ८७ हजार ९०० रुपयांच्या बिलाची पूर्तता तत्कालीन सरकारकडून करण्यात आली नाही. (प्रतिनिधी)