खंडणीसाठी गुंडांचा बारमध्ये गोंधळ
By Admin | Updated: April 7, 2017 02:40 IST2017-04-07T02:40:18+5:302017-04-07T02:40:18+5:30
कुख्यात मीर मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बीअर बारमध्ये

खंडणीसाठी गुंडांचा बारमध्ये गोंधळ
नागपूर : कुख्यात मीर मिश्रा आणि त्याच्या साथीदारांनी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बीअर बारमध्ये बुधवारी रात्री खंडणीसाठी तोडफोड केली.
कुख्यात मीर मिश्रा, सागर धुमाणे, पवन चौधरी आणि त्यांच्या काही साथीदारांसह बुधवारी रात्री १०.३० वाजता हुडकेश्वरमधील रॉक अॅण्ड रॅम्बो बार रेस्टारंटमध्ये आले. त्यांनी तेथे १५०० रुपयांची दारू ढोसली. त्यानंतर बिल न देताच ते तेथून निघू लागल्याने काऊंटरवरील पारस रामप्रसाद शाहू (वय ४५) यांनी त्याला दारूचे बिल मागितले. यावेळी उपरोक्त आरोपींनी ‘हम इस येरिया के भाई है. हमको पहचानता नही क्या‘, असे म्हणत शाहू आणि अन्य वेटर्सना शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर आपल्याला १५ हजार रुपये महिना खंडणी दिली तरच बार चालू देईल, अशी धमकीही दिली. शाहू यांनी हुडकेश्वर ठाण्यात तक्रार नोंदवली. (प्रतिनिधी)