शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

ट्रकच्या हुकने नेले फरफटत: तरुणीचा घटनास्थळीच मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:09 IST

अ‍ॅक्टिव्हाने ऑफीसला जात असताना मागून आलेल्या ट्रकच्या हुकमध्ये ओढणी अडकली आणि तरुणी ट्रकच्या मागच्या चाकाखाली ओढल्या गेली. त्यात अंदाजे ३० मीटर फरफटत गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडी परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या वाडी परिसरात अपघात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (वाडी) : अ‍ॅक्टिव्हाने ऑफीसला जात असताना मागून आलेल्या ट्रकच्या हुकमध्ये ओढणी अडकली आणि तरुणी ट्रकच्या मागच्या चाकाखाली ओढल्या गेली. त्यात अंदाजे ३० मीटर फरफटत गेल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर-अमरावती महामार्गावरील वाडी परिसरात मंगळवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली.पूजा ओमप्रकाश तिवारी (२८, रा. नवनीतनगर, वाडी) असे मृत तरुणीचे नाव आहे. पूजा वाडी-हिंगणा मार्गावर असलेल्या अजमेरा टायर्स या फर्ममध्ये अकाऊंटंटपदी वर्षभरापासून नोकरी करायची. ती नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी तिच्या एमएच-४०/बीबी-१३३० क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हाने ऑफीसला जायला निघाली. महामार्गावरून जाताना मागून आलेल्या एमएच-१२/एमव्ही-४६०० क्रमांकाच्या ट्रकच्या मागचा लोखंडी हुक तिच्या ओढणीला अडकला.परिणामी, तोल गेल्याने ती खाली कोसळली आणि ट्रकसोबत अंदाजे ३० मीटरपर्यंत फरफटत गेली. विशेष म्हणजे, तिने हेल्मेट परिधान केले होते. फरफटत गेल्याने तिला गंभीर दुखापत झाली आणि घटनास्थळीच तिचा मृत्यू झाला; शिवाय हेल्मेटचाही चक्काचूर झाला होता. या घटनेमुळे परिसरात तणावसदृश वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पूजाचा मृतदेह ताब्यात घेत उत्तरीय तपासणीसाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात पाठविला, शिवाय नागरिकांनाही शांत केले.अपघात होताच ट्रकचालक शिवलाल रामप्रसाद शिंदे (३०, रा. टाकळखेड, ता. चिखली, बुलडाणा) याने घटनास्थळाहून पळ काढला होता, नंतर काही वेळाने तो पोलीस ठाण्यात हजर झाला. याप्रकरणी वाडी पोलिसांनी शिवलालविरुद्ध भादंवि ३०४ (अ), २७९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. या घटनेचा तपास ठाणेदार राजेंद्र पाठक यांच्या मार्गदर्शनात वाडी पोलीस करीत आहेत.ओढणीने केला घातपूजाचे वडील ओमप्रकाश तिवारी हे मूळचे बिहार मधील असून, ते ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये नोकरीला असल्याने वाडी येथील नवनीतनगरात राहातात. पूजाला एक भाऊदेखील आहे. पूर्वी ती सेवा ऑटोमोबाईल्समध्ये नोकरी करायची. वर्षभरापूर्वी तिने अजमेरा टायर्समध्ये कामाला सुरुवात केली होती. शिवाय, शिवलालने वडधामना येथील टीसीआय एक्स्प्रेसमधून ट्रकमध्ये साहित्य घेतले आणि ओडिशामध्ये जायला निघाला होता. तिची ओढणी ट्रकच्या हुकमध्ये अडकली आणि घात झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू