श्री बिंझाणी सिटी कॉलेजतर्फे गुरु-शिष्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:06 IST2021-07-22T04:06:44+5:302021-07-22T04:06:44+5:30

नागपूर : श्री बिंझाणी सिटी कॉलेजच्या ९१ व्या स्थापना दिनानिमित्त कॉलेजच्या गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या ...

Honors of Guru-Shishis by Shri Binjani City College | श्री बिंझाणी सिटी कॉलेजतर्फे गुरु-शिष्यांचा सन्मान

श्री बिंझाणी सिटी कॉलेजतर्फे गुरु-शिष्यांचा सन्मान

नागपूर : श्री बिंझाणी सिटी कॉलेजच्या ९१ व्या स्थापना दिनानिमित्त कॉलेजच्या गुणवंत शिक्षक व विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. गेल्या दोन वर्षात कॉलेजचे २१ विद्यार्थी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात गुणवंतांच्या यादीत आले तर कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. संदीप टुंडूरवार, प्रा. पूजा जैस्वाल, प्रा. पुनम बांगडे, प्रा. मोना चांडक यांनी गांधी थॉट मध्ये एम.ए. करून सुवर्णपदक पटकावले. या कार्यक्रमाला नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अशोक गांधी, सचिव डॉ. हरीश राठी, डॉ. राजेंद्र वाटाणे, प्राचार्य डॉ. सुजित मेत्रे उपस्थित होते. यावेळी हिवराई या नेचर क्लबद्वारे वृक्ष दत्तक अभियान राबविण्यात आले. यावेळी उपस्थितांच्या हस्ते वार्षिकांक ‘अंतरंग’ चे प्रकाशन करण्यात आले. यावेळी माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या प्रतिमेचे अशोक गांधी यांच्याहस्ते अनावरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या आयोजनात सुनिता मसने यांचे सहकार्य लाभले. आभार डॉ. नरेंद्र घरत यांनी मानले.

Web Title: Honors of Guru-Shishis by Shri Binjani City College