मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:09 IST2021-09-23T04:09:11+5:302021-09-23T04:09:11+5:30

नागपूर : अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमीच्या वतीने मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ...

Honoring the meritorious students of Matang community | मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नागपूर : अण्णा भाऊ साठे साहित्य व कला अकादमीच्या वतीने मातंग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कमला नेहरू महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. अशोकराव कांबळे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन वर्धा येथील विक्री व सेवाकर विभागाचे सहायक आयुक्त प्रदीप बोरकर यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कौशल्य विकास महामंडळाचे संचालक आसावरी देशमुख, विचारक अरविंद डाेंगरे, उद्योजक रवींद्र खडसे, लहू सेनेचे संस्थापक रवींद्र वानखेडे, नेत्रतज्ज्ञ डॉ. आशिष कांबळे उपस्थित होते. प्रारंभी संस्थेचे माजी अध्यक्ष स्व. प्रकाश डोंगरे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संगीता वाघमारे यांनी स्वागत गीत सादर केले. यावेळी समाजातील उच्च शिक्षित व कर्तबगारांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर ८० गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे यांनी केले तर आभार रायभान डोंगरदिवे यांनी मानले.

...

Web Title: Honoring the meritorious students of Matang community