मासिक सभेचे मानधन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:09 IST2021-01-17T04:09:00+5:302021-01-17T04:09:00+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही : देवळी (कला) (ता. कुही) येथील ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांना १५ महिन्यांपासून ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे मानधन ...

मासिक सभेचे मानधन रखडले
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही : देवळी (कला) (ता. कुही) येथील ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांना १५ महिन्यांपासून ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे मानधन देण्यात आले नाही. त्यातच मतदार याद्यांमध्ये घाेळ असल्याचे कारण पुढे करून या ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूकही रद्द करण्यात आली. या प्रकरणाची चाैकशी करून दाेषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे राज्य निवडणूक आयाेगाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले आहेत.
देवळी (कला) या ग्रामपंचायतचा पाच वर्षांचा कार्यकाळ तीन महिन्यांपूर्वीच संपल्याने येथे सार्वत्रिक निवडणूक हाेणे अपेक्षित हाेते. मात्र, येथील मतदार याद्यांमध्ये घाेळ असल्याचे उघड हाेताच राज्य निवडणूक आयाेगाने येथील निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नव्हे तर या प्रकरणाची चाैकशी करून यात दाेषी असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देशही राज्य निवडणूक आयाेगाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले आहेत.
दुसरीकडे, ग्रामपंचायतच्या मासिक सभेचे १५ महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाही, असा आराेप ग्रामपंचायतच्या महिला सदस्यांनी केला असून, ग्रामसेवक जयेंद्र साेळंकी यांनी मानधन मुद्दा प्रलंबित ठेवल्याचा आराेप त्यांनी केला आहे. जयेंद्र साेळंकी मानधन देण्यास टाळाटाळ करतात. कधी ग्रामपंचायत कर्मचारी रवी सहारे यांच्याकडून घेऊन जाण्याच सूचना करतात. परंतु, कर्मचाऱ्याकडे रक्कम ठेवत नाही, असेही महिला सदस्यांनी खंडविकास अधिकारी मनाेज हिरूडकर यांच्याकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणाची चाैकशी करून तातडीने मानधन देण्याची मागणी त्यांनी केली आहे.