महामानवाला आदरांजली
By Admin | Updated: April 17, 2016 03:03 IST2016-04-17T03:03:19+5:302016-04-17T03:03:19+5:30
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली.

महामानवाला आदरांजली
जयभीमचा गजर : विविध संस्था, संघटनांच्या वतीने जयंतीचे आयोजन
नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती गुरुवारी शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि शैक्षणिक संघटनांसह आंबेडकरी अनुयायांनी दीक्षाभूमी व संविधान चौक येथे जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले. यावेळी शहरातील विविध भागातून ढोल ताशांच्या गजरात रॅली काढण्यात आली. शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले. एकूणच जय भीमच्या घोषणांनी आसमंत निनादला होता.
भीमशक्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमशक्तीतर्फे रॅली काढण्यात आली. त्यानंतर संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबा बन्सोड, अॅड. यशवंत मेश्राम, राजेश देशभ्रतार, रामराव गाडेकर, बंडू बोरकर, प्रमोद मेश्राम, अब्दुल रफीक, नरेंद्र जैन, अनिल मेश्राम, राकेश बनवारी, माधवी बनसोड, स्मिता चव्हाण, जयरामसिंग चव्हाण, भूमी बनसोड आदी उपस्थित होते.
महावितरण
महावितरण नागपूर परिमंडळातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अधीक्षक अभियंता उमेश शहारे, भारतीय समाजविज्ञान व अनुसंधान परिषदेचे अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात, डॉ. हेमंत तिरपुडे, जे.एस. पाटील, मुख्य अभियंता प्रसाद रेशमे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अरविंद भादीकर, राकेश जनबंधू, सम्राट वाघमारे, महेंद्र ढोबळे, मधुसूदन मराठे उपस्थित होते.
अंबिका उच्च प्राथमिक शाळा
उत्तर नागपुरातील अंबिका उच्च प्राथमिक शाळा, राजीव गांधीनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालन ओमप्रकाश कहाटे, नगरसेवक गोपीचंद कुमरे, प्रतिमा शाहू, अंजु पालो, अंजली कुंभारे, पूजा मारोय, सानु शेख हुसैन, आचल कुंभारे आदी उपस्थित होते.
आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळ
आदर्श ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे भैसारे भवन काटोल रोड येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शेख गुरुजी, मधुकर भरणे, कविता गोतमारे, हरिहर करडीकर, मनीषा दुरुगकर, नलिनी धोटे, केशव शास्त्री, मोरेश्वर भैसारे, केशव शास्त्री, शेषराव जमगडे, वासुदेव बढिये, गणपतराव गुळांधे, पुष्पा दुरुगकर उपस्थित होते.
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी
राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रधान महानिदेशक गुंजन मिश्रा, अप्पर महानिदेशक आर.के. चौबे, मदनेश कुमार मिश्र, अपर महानिदेशक, लीना श्रीवास्तव, संजय कुमार, संजय धारीवाल उपस्थित होते.
कश्मीर विद्या मंदिर
अर्चना फुले हायस्कूल व कश्मीर विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने विनोबा भावेनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी शाळेचे संचालक रमेश फुले, अध्यक्षा अर्चना फुले प्रामुख्याने उपस्थित होते.
नीरी
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्थान (सीएसआयआर- नीरी) तर्फे क्लब हाऊस नीरी कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील बोंडे, माजी कार्यकारी निदेशक डॉ. तपन चक्रवर्ती, डॉ. अशोक डोंगरे, राजेंद्र जुनघरे, प्रकाश कुंभारे, एम.जी. दळवी, डॉ. एन.सी. कंकाल, डॉ. संजय गजभिये, एन.व्ही. मेश्राम, के.के. हुमे, विपुल कुमार उपस्थित होते.
राणी दुर्गावती कल्याणकारी मंडळ
राणी दुर्गावती कल्याणकारी मंडळातर्फे राणी दुर्गावती चौक आदिवासी कॉलनी येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सुभाष मसराम, लक्ष्मी जांभुळकर, रंजन कुंभरे, कुमारी नंदेश्वर, जगदीश आत्राम, लोचन मोकासे, हेमंत मेहरे, मनोहर मसराम प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. आंबेडकर मॅराथॉन दौड समिती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. आंबेडकर मॅराथॉन दौड समितीच्यावतीने संविधान चौक ते दीक्षाभूमी चौक दरम्यान दौड आयोजित करण्यात आली. या दौड स्पर्धेतील विजेत्याना पुरस्कृत करण्यात आले. यावेळी आमदार सुनील केदार, राजाभाऊ ताकसांडे, डॉ. पंडित खांडेकर, योगेश ठाकरे, जयदेव चिवंडे, शरद सूर्यवंशी, प्रा. बबनराव तायवाडे, यशवंत तेलंग, डॉ. नरेंद्र खोब्रागडे, डॉ. विवेकानंद सिंग, रवींद्र टोंग प्रामुख्याने उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी कृती समिती
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी कृती समितीतर्फे नागपूर विद्यापीठाच्या वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते ग्रंथालयात प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय परिवर्तन परिषदेचे डॉ. चंद्रशेखर चांदेकर, डॉ. किशोर काळे, तहसीलदार प्रताप वाघमारे, प्रा. दिलीप चौधरी आणि नरेंद्र भाजीखाये यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पवन, वाघमारे, शिल्पा वाघमारे, समीर मून , प्राजू हिरेखण, मिथून शिरसाट यांचा सत्कार करण्यात आला. तुषार पाटील, राजू उके, यशपाल वंजारी, शैलेश भगत, पंकज चौधरी, अखिलेश गणवीर, अमन गायकवाड, नितेश अंबादे, अमोल ठाकरे, चंद्रदीप कांबळे सारंग वैरागडे, प्रीती शेंडे, बाली मेश्राम, शिल्पा वाघमारे, प्रतिभा जवादे प्रामुख्याने उपस्थित होते.
प्रयास
प्रयास रिहॅबिलिटेशन सोसायटीद्वारा संचालित प्रयास स्कूल फॉर चिल्ड्रेन विथ स्पेशल निड्स धरमपेठ येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. संचालक रितेश दिवे, किरण बिनकर प्रामुख्याने उपस्थित होते.
पावा बुद्ध विहार, बोरगाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त बोरगाव गोरेवाडा रोड येथील पावा बुद्ध विहारातर्फे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. पंचशील ध्वजाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. बोरगाव परिसरातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर भोजनदान करण्यात आले. यावेळी पावा बुद्ध विहार समिती व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सम्बोधी बुद्धविहार
सोमलवाडा महात्मा फुलेनगर येथील सम्बोधी बुद्ध विहार सुजाता महिला मंडळातर्फे डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी राष्ट्रपारिवारिक धम्म संगोष्टी बौद्ध महिला मैत्री संघाच्या प्रमुख पुष्पाताई बौद्ध यांनी मार्गदर्शन केले. मुरलीधर रामटेके, विद्या चौधरी, अनिता वासनिक, कुंदा गोंडाणे उपस्थित होते.
मध्य रेल्वे
मध्य रेल्वे येथील लोको पायलट व गार्डस् लॉबी येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. यावेळी वनराईचे गिरीश गांधी, डॉ. रूपाताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. अप्पर मंडळ रेल्वे व्यवस्थापक जयदीप गुप्ता, एस.के. शुक्ला, डी.आर. टेंभुर्णे, महेशकुमार प्रामुख्याने उपस्थित होते.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभाग आणि अखिल भारतीय अनुसूचित जाती, जनजाती रेल्वे कर्मचारी संघटनेतर्फे विभागाच्या सभागृहात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय रेल्वे व्यवस्थापक आलोक कंसल उपस्थित होते. कार्यक्रमाला अधिकारी आणि संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आभार एम.एस. खोब्रागडे यांनी मानले.
भारतीय विमानतळ प्राधिकरण
मिहान, भारतीय विमानपत्तन प्राधिकरण आणि एएआय अनुसूचित जाती जनजाती कर्मचारी कल्याण संघ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई, एस.व्ही,. चहांदे, आबीद रुही प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी डी.बी. सातपुते, सफीक शाह, सुनील मग्गीरवार, दिलीप जाधव, अशोक केसारकर, विजय आवळे, सुनील सोनटक्के आदी उपस्थित होते.
मध्य रेल्वे नागपूर विभाग
विभागाच्या सभाकक्षात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ.पी. सिंह यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक जयदीप गुप्ता, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाला आॅल इंडिया एस.सी., एस.टी, रेल्वे एम्प्लॉईज असोसिएशनचे विभागीय सचिव निकेश उके, सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे विभागीय अध्यक्ष विनोद चतुर्वेदी, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे एस. आर. नेहारे उपस्थित होते. आभार सहायक कार्मिक अधिकारी रमेश अय्यर यांनी मानले.
मैत्रेय सामाजिक संस्था
मैत्रेय सामाजिक संस्थेतर्फे संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशांत फुलके, महेश राऊत, राजू कांबळे, सुरेश वालदे, मनोहर वासनिक, महेश सहारे, किशोर सातपुते, मुकेश शामकुळे, मिलिंद अंबादे, राजेश रामटेके, बाळू सोकमकर आदी उपस्थित होते.
नॅशनल पीपल्स सोशल आॅर्गनायझेशन
नॅशनल पीपल्स सोशल आॅर्गनायझेशनततर्फे संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेश ढेंगरे, नगरसेविका सुजाता कोंबाडे, डॉ. दिलीप सुखदेवे, डॉ. विठ्ठलराव कोंबाडे, संजय मून, गौतम ढेंगरे, डॉ. अनिल हिरेखण, ज्येष्ठ नाटककार अमर रामटेके, डॉ. राजाभाऊ टांकसाळे, पंकज चवरे, अरुण गाडे, रवि पोथारे, प्रशांत बन्सोड, अरविंद शेवाळे, कैलास खोंडे, डॉ. मिलिंद जीवने, अष्टदीप नगरारे, संघरत्न गाणार आदी उपस्थित होते.
वन विभाग
वनविभागातर्फे सिव्हील लाईन्स वनभवन येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. प्रा. नीरज बोधी, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्री भगवान, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक पी.एन. मुंडे, ए.के. मिश्रा, ए. अश्रफ, बी.पी. सिंह, प्रदीप कुमार, शैलेश टेंभुर्णीकर, यशवीर सिंह, ऋषिकेश रंजन आदी उपस्थित होते.
कृषी महाविद्यालय
कृषी महाविद्यालय येथे डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. सहयोगी अधिष्ठाता डॉ. विलास खर्चे, नितीन गणोरकर प्रमुख अतिथी होते. आकाश भगत, ओंकार राठोड, निखील ताकसांडे, प्रभू जोगदंड, प्रज्ञा दहिवले, ऐश्वर्या सहारे, आयुषी राऊत यांनी आपले मनोगत व्यक्त केले. डॉ. विष्णूकांत टेकाळे यांनी प्रास्ताविक केले. श्रद्धा देवगडे व अमोल इंगळे यांनी संचालन केले. अक्षय बागडे यांनी आभार मानले.
राजीव गांधी विचार मोर्चा
मोर्चाच्या वतीने रेणुकानगरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी चौकात तथागत चौकाच्या फलकाचे अनावरण अनिल पांडे यांनी केले. कार्यक्रमाला रवींद्र केळझरे, संतोष कोरडे, देवेंद्र भोसले, सिद्धार्थ मोटे, श्रीराम पाल, राजेश डोंगरे, मोनु मोटे, तारेश दुरुगकर, पूरण राजे, सुमन भोसले, ऊर्मिला वर्मा, मंगला मोटे, वर्षा राजे, बेबी बोकडे उपस्थित होत्या.