हनीसिंग प्रकरणातील प्रतिज्ञापत्र खोटे
By Admin | Updated: July 22, 2015 03:23 IST2015-07-22T03:23:42+5:302015-07-22T03:23:42+5:30
गायक हनीसिंग, बादशाह व रफ्तार यांच्यावर अश्लील गाणी गाण्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे.

हनीसिंग प्रकरणातील प्रतिज्ञापत्र खोटे
नागपूर : गायक हनीसिंग, बादशाह व रफ्तार यांच्यावर अश्लील गाणी गाण्याचा आरोप करून मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात फौजदारी रिट याचिका दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले, असा आरोप याचिकाकर्त्याचे वकील रसपालसिंग रेणू यांनी मंगळवारी सुनावणीदरम्यान केला.आनंदपालसिंग जब्बल असे याचिकाकर्त्याचे नाव आहे. याचिकाकर्त्याने तक्रार केली नसल्यामुळे गायक रफ्तारविरुद्ध कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असे स्पष्टीकरण पाचपावली पोलिसांनी प्रतिज्ञापत्रात दिले आहे. पोलिसांचे म्हणणे खोटे आहे. रफ्तारचे नाव सुरुवातीपासूनच तक्रारीत आहे, असे रेणू यांनी सांगितले. ही बाब लक्षात घेता, न्यायालयाने याचिकेवर २८ जुलै रोजी पुढील सुनावणी निश्चित केली. न्यायालयाच्या निर्देशावरून पाचपावली पोलिसांनी २६ एप्रिल २०१४ रोजी हनीसिंग व बादशाहविरुद्ध भादंविच्या कलम २९२, २९३ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७, ६७-अ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. रफ्तारविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आलेला नाही.(प्रतिनिधी)