शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

पोळ्यातील मध काढणे जीवावर बेतले, गुराख्याचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 19:24 IST

पोळ्यातील मध काढण्यासाठी झाडावर चढलेला गुराखी हात घसरल्याने खाली कोसळला आणि मध्येच झाडाच्या फांदीला अडकला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या सायगाव शिवारात मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

ठळक मुद्देनागपूरनजीकच्या सायगाव शिवारातील घटनाझाडावरून पडला आणि झाडातच अडकला

आॅनलाईन लोकमतनागपूर : पोळ्यातील मध काढण्यासाठी झाडावर चढलेला गुराखी हात घसरल्याने खाली कोसळला आणि मध्येच झाडाच्या फांदीला अडकला. त्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना भिवापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांद नजीकच्या सायगाव शिवारात मंगळवारी सकाळी उघडकीस आली.शत्रुघ्न मनीराम रंदई (६०, रा. सायगाव, ता. भिवापूर) असे मृत गुराख्याचे नाव आहे. शत्रुघ्न हा गाई चारण्यासोबत मध गोळा करून त्याच्या विक्रीतून मिळणाऱ्या   पैशावर उदरनिर्वाह करायचा. तो सोमवारी सकाळी गावालगतच्या जंगलात गुरे चारण्यासाठी गेला होता. वाटेतील पिंपळाच्या झाडावर त्याला मधाचे पोळे दिसले. त्याचवेळी त्याने पोळ्यातील मध काढण्याचे ठरविले. सायंकाळी घरी परतल्यानंतर तो रात्री ११ वाजताच्या सुमारास कडाक्याची थंडी असूनही पुन्हा मध काढण्यासाठी पिंपळाच्या झाडाजवळ गेला.त्याने झाडावर चढून मध गोळा करण्यासाठी लोखंडी बादली पोळ्याच्या खाली बांधली आणि उतरायला लागला. त्यातच त्याच्या हाताला मध लागले आणि त्याची झाडाच्या फांदीची पकड सैल होऊन हात घसरला. त्यामुळे तो खाली कोसळला. मात्र, जमिनीवर पडण्याऐवजी मध्येच फांदीला अडकला. त्यात गंभीर मुका मार लागल्याने तो झाडावरच बेशुद्ध पडला आणि काही वेळातच झाडावरच त्याचा मृत्यू झाला.तो रात्रभर घरी परत न आल्याने घरच्या मंडळींनी सकाळी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. तेव्हा तो पिंपळाच्या झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. माहिती मिळताच भिवापूर पोलिसांनी घटनास्थळ गाठले व मृतदेह झाडावरून काढत उत्तरीय तपासणीसाठी भिवापूर येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. या प्रकरणी भिवापूर पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे.थंडीमुळे मदत मिळाली नाहीशत्रुघ्नने झाडावरून कोसल्यानंतर लगेच मदतीसाठी आरडाओरड केली असेल. परंतु, मध्यरात्री या शिवारात फारसे कुणी राहात नसल्याने तसेच कडाक्याची थंडी असल्याने कुणीही त्याच्या मदतीला धावले नाही. शिवाय, तो मध गोळा करण्यासाठी एकटाच गेला होता. झाडाच्या फांदीचा मुका मार आणि थंडी यामुळे तो झाडावरच गतप्राण झाला.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर