होंडा ‘जाझ’चे थाटात उद्घाटन

By Admin | Updated: July 9, 2015 02:53 IST2015-07-09T02:53:28+5:302015-07-09T02:53:28+5:30

होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या देशातील प्रीमियम कार बनविणाऱ्या कंपनीने नवीन थर्ड जनरेशन

Honda Jazz inaugurated in Thatta | होंडा ‘जाझ’चे थाटात उद्घाटन

होंडा ‘जाझ’चे थाटात उद्घाटन

रुषभ होंडामध्ये विक्रीस दाखल : इम्पेरिअर होंडामध्ये बुकिंग सुरू
नागपूर : होंडा कार्स इंडिया लिमिटेड (एचसीआयएल) या देशातील प्रीमियम कार बनविणाऱ्या कंपनीने नवीन थर्ड जनरेशन होंडा जाझ कार बुधवारी नागपुरात विक्रीसाठी दाखल केली.
कंपनीचे अधिकृत विक्रेते अमरावती रोड येथील रुषभ होंडा आणि वर्धा रोड येथील इम्पेरिअर होंडा या दोन्ही शोरूममध्ये कारचे थाटात उद्घाटन करण्यात आले व ग्राहकांना कारची डिलेव्हरी देण्यात आली.
उद्घाटनप्रसंगी रुषभ होंडामध्ये कंपनीचे क्षेत्रीय विक्री व्यवस्थापक विपुल चौधरी, शोरूमचे महाव्यवस्थापक (विक्री) डेव्हिल एशिया, सेवा व्यवस्थापक नितीन खंडेराय आणि ग्राहक नितीन बलघट प्रामुख्याने उपस्थित होते.
इम्पेरिअर होंडा येथे झालेल्या भव्य दाखलीकरण समारंभात कंपनीचे क्षेत्रीय व्यवस्थापक विपुल चौधरी, शोरूमचे महाव्यवस्थापक अमरदीप सिंग, व्यवस्थापक (मार्केटिंग) रत्नाकर मुळीक आणि ग्राहक सुरेश वाजा उपस्थित हजर होते. दोन्ही शोरूममध्ये बुकिंग व टेस्ट ड्राईव्ह सुरू आहे.
पत्रपरिषदेत चौधरी म्हणाले, नवीन जाझला जगातील बेस्ट कार्यकुशल कॉम्पॅक्ट हॅचबॅकच्या रूपात विकसित केले आहे. डायनामिक स्टायलिंग, उत्कृष्ट पॅकेज, श्रेणीतील उत्तम इंधन क्षमता, प्रगत तंत्रज्ञान व उपकरण तसेच बहुउपयोगिता यात सादर करण्यात आली आहे.
पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही पर्यायात उपलब्ध आहे. भारतीय बाजारपेठेसाठी १.५ लिटर आय-डीटीसी डिझेल इंजिन विकसित करण्यात आले असून आपल्या श्रेणीत २७.३ कि़मी. प्रति लिटर मायलेज देते. जाझ हे जागतिक पातळीवर सर्वांच्या पसंतीला उतरलेले यशस्वी मॉडेल आहे. २००१ साली फर्स्ट जनरेशनच्या लाँचिंगनंतर ७५ देशांत ५५ लाख गाड्या विकल्या गेल्या. गाडीत टच स्क्रीन आॅडिओ सिस्टीम, टच स्क्रीन नेव्हिगेशन, टच स्क्रीन एसी कंट्रोल, रिअर कॅमेरा अशा अत्याधुनिक यंत्रणा आहेत. ड्राईव्हिंग सीटवरदेखील अनेक फिचर्स व आकर्षक स्टेअरिंग दिले आहे.
स्पीडोमीटरमध्ये इको असिस्ट सिस्टीम असून ते ड्रायव्हिंग स्टाईलनुसार रंग बदलते. इंटिरियर पाहता क्षणीच डोळ्यात भरते. डॅशबोर्डवरील फिनिशिंग अत्यंत आकर्षक आहे.
गाडीचा व्हील बेस जास्त असल्यामुळे दोन सीटमधील अंतर वाढले आहे. एकूणच कारमध्ये बसल्यावर सिडान कारमध्ये बसल्याचा फील येतो. (वा. प्र.)

Web Title: Honda Jazz inaugurated in Thatta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.