'होमड्रॉप' उपक्रम स्थायी स्वरूपात राबवा  : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 12:31 AM2020-01-16T00:31:34+5:302020-01-16T00:32:23+5:30

नागपूर पोलिसांतर्फे सुरू केलेला ‘होमड्रॉप’ उपक्रम स्थायी स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्यमंत्री गृह (शहरे), सतेज पाटील यांनी बुधवारी रविभवन येथील बैठकीत दिले.

Homedrop initiative to be implemented in a sustainable manner: State Home Minister Satej Patil | 'होमड्रॉप' उपक्रम स्थायी स्वरूपात राबवा  : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

'होमड्रॉप' उपक्रम स्थायी स्वरूपात राबवा  : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

Next
ठळक मुद्देकायदा-सुव्यवस्थेचा घेतला आढावा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर पोलिसांतर्फे सुरू केलेला ‘होमड्रॉप’ उपक्रम स्थायी स्वरुपात राबविण्याचे निर्देश राज्यमंत्री गृह (शहरे), सतेज पाटील यांनी बुधवारी रविभवन येथील बैठकीत दिले. पदभार स्वीकारल्यानंतरची नागपूर येथील पहिली आढावा बैठक त्यांनी घेतली.
रात्री १० वाजल्यानंतर महिलांना वाहन उपलब्ध नसल्यास त्यांना ‘होमड्रॉप’ या सुविधेद्वारे महिला पोलिसांसह त्यांच्या घरी पोहोचविण्यात येते. या सुविधेला महिलांचा चांगला प्रतिसाद आहे. गेल्या महिन्यात ६७ महिलांना घरी सुखरूप पोहोचविण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. यावर महिलांना रात्री सुरक्षितरीत्या पोहोचविण्यासाठी केलेली ‘होमड्रॉप’ ही सुविधा उत्तम असून ही स्थायी स्वरुपात करण्याची सूचना गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी केली.
२०१९ मधील गुन्ह्यांची माहिती, डिटेक्शन टक्केवारी, प्रतिबंधक कारवाई, पोलिसांनी राबविलेले उपक्रम व भविष्यातील नियोजनाची माहिती आयुक्तांनी दिली.
२०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये एकूण गुन्ह्यात दहा टक्क्याची घट झाली आहे. २०१९ मध्ये एमपीडीए व ३३ इसमांना स्थानबद्ध करण्यात आले होते तर ‘मकोका’ अंतर्गत २०१९ मध्ये १३ गुन्हेगारी टोळ्यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
भरोसा सेल, हितगूज कार्यक्रम, छात्र पोलीस उपक्रम, केअर, कम्युनिटी पोलिसिंग आदी उपक्रमाबाबत गृहराज्यमंत्री पाटील यांनी जाणून घेतले.
यावेळी नियोजनाने व चांगल्या पद्धतीने काम करण्याच्या सूचनाही गृहराज्यमंत्री महोदयांनी दिल्यात. या बैठकीला पोलीस आयक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, विशेष पोलीस महानिरीक्षक के. एम. मल्लिकार्जुन प्रसन्ना, सह पोलीस आयुक्त रवींद्र् कदम, पोलीस अधीक्षक राकेश ओला यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Homedrop initiative to be implemented in a sustainable manner: State Home Minister Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.