मनसर येथे महाआवास अभियानांतर्गत गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:11 IST2021-06-16T04:11:56+5:302021-06-16T04:11:56+5:30

देवलापार : शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल याेजना राबविली जाते. मनसर (ता. रामटेक) येथे काही लाभार्थ्यांनी त्यांच्या घरकुलांचे बांधकाम ...

Home entry under Mahawas Abhiyan at Mansar | मनसर येथे महाआवास अभियानांतर्गत गृहप्रवेश

मनसर येथे महाआवास अभियानांतर्गत गृहप्रवेश

देवलापार : शासनाच्या वतीने ग्रामीण भागात घरकुल याेजना राबविली जाते. मनसर (ता. रामटेक) येथे काही लाभार्थ्यांनी त्यांच्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले. त्यामुळे जिल्हा परिषद नागपूर, पंचायत समिती रामटेक व ग्रामपंचायत मनसर यांच्या संयुक्त विद्यमाने मनसर येथे लाभार्थ्यांच्या गृहप्रवेश कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते.

रमेश वामनराव रंगारी, रा. वाॅर्ड क्रमांक-४, मनसर यांना रमाई आवास याेजनेंतर्गत घरकुल मंजूर करण्यात आले हाेते. त्यांनी या घरकुलांचे बांधकाम नियाेजित काळात पूर्ण केले. त्यांच्या या गृहप्रवेश कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य सतीश डाेंगरे, सरपंच याेगेश्वरी चाेखांद्रे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक सागर वानखेडे, ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शुभम खडसे, मयूर कोल्हे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र रामटेके, नंदकिशोर चंदनखेडे, ग्रामपंचायत सदस्या संगीता पंधराम, सीमा गजबेस, लता उईके, रोजगार सेवक विनय मेश्राम यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी व नागरिक उपस्थित हाेते.

Web Title: Home entry under Mahawas Abhiyan at Mansar