शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Nagpur; उपराजधानीत खर्रा, दारूची होम डिलिव्हरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:26 IST

दारू, गुटखा, खर्रा आणि सिगारेटचे व्यसन असलेले लोक आपली गरज पूर्ण करण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी या वस्तूंची अवैध विक्री करणारे लोक ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ देत आहेत.

ठळक मुद्देदुप्पट, तिप्पट किमतीने विक्रीसायबर गुन्हेगारही सक्रिय

जगदीश जोशीलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊनदरम्यान अनेकांना खाण्यापिण्याच्या वस्तूंचा तुटवडा सहन करावा लागतो आहे. दुसरीकडे दारू, गुटखा, खर्रा आणि सिगारेटचे व्यसन असलेले लोक आपली गरज पूर्ण करण्यासाठी जीव धोक्यात घालत आहेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी या वस्तूंची अवैध विक्री करणारे लोक ग्राहकांना ‘होम डिलिव्हरी’ देत आहेत. या वस्तूंची दुप्पट, तिप्पट किमतीने विक्री होत असताना ग्राहकांची गर्दी या विक्रेत्यांकडे होत आहे. लॉकडाऊनच्या कारणामुळे पानठेले आणि दारूची दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. दारूची दुकाने लॉकडाऊन लागू होण्यापूर्वीच १८ मार्च रोजी बंद करण्यात आली होती. दुकाने बंद होण्याची माहिती मिळताच शौकिनांनी दारू दुकानासमोर रांग लावून गरजेनुसार दारूचा स्टॉक खरेदी केला होता. अनेक दारूविक्रेत्यांनीही क्षमतेनुसार मालाचा स्टॉक करून ठेवला आहे.जिल्ह्यातील दकाने आणि बार बंद करण्याच्या दोन तीन दिवसांनंतर महसूल विभागाने ती सील केली होती. सुरुवातीला राज्य शासनातर्फे ३१ मार्चपर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली होती. यानुसारच दारूविक्रेते आणि शौकिनांनीही स्टॉक करून ठेवला होता. नंतर मात्र लॉकडाऊन १४ एप्रिलपर्यंत वाढविण्यात आले. मात्र परिस्थिती बघता संपूर्ण एप्रिल महिन्यापर्यंत लॉकडाऊन वाढण्याची शक्यता आहे. यामुळे बहुतेक लोकांनी जमवून ठेवलेला स्टॉक आता संपलेला आहे. ज्यांच्याकडून नियमित माल घेते होते त्यांनीही हात वर केले आहेत. त्यामुळे पिणाऱ्यांची अडचण होत आहे. अशावेळी काळाबाजार करणाऱ्या आणि दारूच्या नावाने फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात लोक ओढले जात आहेत. एकीकडे अवैध विक्रेते तिप्पट किमत घेऊन दारू देत आहेत तर दुसरीकडे सायबर गुन्हेगार होम डिलिव्हरीचे आमिष दाखवून ग्राहकांना लुटत आहेत. काही दिवसांपूर्वी वाठोडा पोलिसांनी दारूची आॅनलाईन होम डिलिव्हरी करण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदविला होता. मात्र सायबर गुन्हेगार वेगवेगळ्याबारच्या नावाने ग्राहकांना लुटण्याचे काम करीतच आहेत. हीच स्थिती खर्रा, गुटखा, सिगारेटचे व्यसन असणाऱ्यांचीही आहे. नागपुरी खर्रा देशभरात प्रसिद्ध आहे. हेच व्यसन कॅन्सर रुग्णांची संख्या वाढण्याचेही कारण ठरले आहे. शहराच्या लोकसंख्येचा मोठा भाग खºर्याच्या व्यसनाच्या विळख्यात आहे. यात महिला आणि अल्पवयीन मुलांची संख्याही मोठी आहे. अशा ग्राहकांना पानठेला चालविणारे दुकानदार दुप्पट किमतीने घरून खºर्याची विक्री करीत आहेत. गुटखा, विडी व सिगारेटसाठी तिप्पट किंमत वसूल केली जात आहे. काही पानठेला चालकांनी पोलिसांपासून बचावासाठी भाजीचे दुकान सुरू केले आहे. त्याआड खर्रा, सिगारेटची विक्री केली जात आहे. पानठेलाचालक व दुकानदार ब्रॅन्डेड पानमसाल्याच्या विक्रीतून सर्वाधिक नफा कमावत आहेत. ब्रॅन्डेड पानमसाल्याचा शौक करणारा विशेष ग्राहक असतो ज्यांच्यासाठी किंमत महत्त्वाची नसते. इतवारीतील व्यापाऱ्यांनी दुकाने उघडून गुटखा सुरक्षित स्थळी हलविला आहे.सुपारी व्यापाऱ्यांची चांदीखºर्यासाठी विशेष सुपारीची आवश्यकता असते. ही सुपारी ३०० ते ३२५ रुपये किलो भावाने विकली जायची. खºर्याची वाढती मागणी आणि होणारा काळाबाजार पाहता हीच सुपारी ५०० ते ५५० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. इतवारीच्या अनेक व्यापाऱ्यांची सुपारी विक्रीतून चांदी होत आहे. प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूंची विक्री बंधनमुक्त ठेवली आहे. त्याच्या आड सुपारी विक्री जोरात सुरू आहे. डिमांड पूर्ण करण्यासाठी रायपूरहून भाजी व धान्याच्या गाडीमधून सुपारी शहरात आणली जात असल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस