उमरेड शहरात घरफाेडी, राेख लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:07 IST2021-07-11T04:07:56+5:302021-07-11T04:07:56+5:30
उमरेड : चाेरट्याने घरफाेडी करीत २० हजार ५०० रुपये राेख चाेरून नेले. ही घटना उमरेड शहरात नुकतीच घडली असून, ...

उमरेड शहरात घरफाेडी, राेख लंपास
उमरेड : चाेरट्याने घरफाेडी करीत २० हजार ५०० रुपये राेख चाेरून नेले. ही घटना उमरेड शहरात नुकतीच घडली असून, गुरुवारी (दि. ८)सकाळी उघडकीस आली.
आनंद गंगाराम तुळे (६४, रा. अड्याळवाले ले-आऊट, उमरेड) हे कुटुंबीयांसह अमरावतीला गेले हाेते. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराची कडी व कुलूप ताेडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेले २० हजार ५०० रुपये घेऊन पाेबारा केला. शेजारी राहणारे वसंत भाेयर यांना त्यांच्या घराचे दार उघडे दिसल्याने त्यांनी आनंद तुळे यांना फाेनवर माहिती दिली. याप्रकरण उमरेड पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस हवालदार आनंद धात्रक करीत आहेत.