सावनेर येथे घरफाेडी, ९४ हजाराचा मुद्देमाल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:13 IST2021-09-10T04:13:31+5:302021-09-10T04:13:31+5:30

सावनेर : शहरातील गुरारीकर ले-आऊट, महालक्ष्मीनगर येथे चाेरट्याने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने व राेख रक्कम असा ९४ हजार ६८० ...

Home burglary at Savner, property worth Rs | सावनेर येथे घरफाेडी, ९४ हजाराचा मुद्देमाल लंपास

सावनेर येथे घरफाेडी, ९४ हजाराचा मुद्देमाल लंपास

सावनेर : शहरातील गुरारीकर ले-आऊट, महालक्ष्मीनगर येथे चाेरट्याने घरफाेडी करीत साेने-चांदीचे दागिने व राेख रक्कम असा ९४ हजार ६८० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

याेगिराज धनराज आसाेले (५३, रा. प्लाॅट नं. ४४, गुरारीकर ले-आऊट, महालक्ष्मीनगर, सावनेर) हे वेकाेलि खाण येथे कामावर गेले हाेते, तर त्यांची पत्नी व मुले घरातील बेडरूममध्ये झाेपले हाेते. दरम्यान, अज्ञात चाेरट्याने त्यांच्या घराच्या खिडकीतून हात टाकून दाराची कडी उघडून घरात प्रवेश केला. यात चाेरट्याने घरातील लाेखंडी कपाटात ठेवलेले ९०,४८० रुपये किमतीचे साेने-चांदीचे दागिने तसेच हँगरला लटकविलेल्या पॅन्टच्या खिशातून राेख ४,२०० रुपये असा एकूण ९४ हजार ६८० रुपयाचा मुद्देमाल चाेरून नेला. ही बाब लक्षात येताच आसाेले यांनी पाेलिसात तक्रार दाखल केली. याप्रकरणी सावनेर पाेलिसांनी भादंवि कलम ४५७, ३८० अन्वये गुन्हा नाेंदविला असून, या गुन्ह्याचा पुढील तपास पाेलीस उपनिरीक्षक सागर कारंडे करीत आहेत.

Web Title: Home burglary at Savner, property worth Rs