शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आला होळीचा सण लई भारी! धुळवड खेळा..इकोफ्रेंडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:45 IST

धुलिवंदन हा नवचैतन्य निर्माण करणारा सण. मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, अशी होळीची कल्पना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. उपराजधानीत धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येलाच रंगोत्सवाचा माहोल सुरू झाला. तरुणाईसह शहरातील व्यापाऱ्यांनी या उत्साहात भर टाकली. अनेकांनी कोरडा रंग खेळून शांततेत धूळवड साजरी करण्याचा संदेश दिला. तर इकोफ्रेंडली होळीवर भर द्यावा, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले.

ठळक मुद्दे उपराजधानीत पूर्वसंध्येलाच रंगोत्सवाची धूम सुरू : खरा रंग आज चढणार!

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धुलिवंदन हा नवचैतन्य निर्माण करणारा सण. मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, अशी होळीची कल्पना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. उपराजधानीत धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येलाच रंगोत्सवाचा माहोल सुरू झाला. तरुणाईसह शहरातील व्यापाऱ्यांनी या उत्साहात भर टाकली. अनेकांनी कोरडा रंग खेळून शांततेत धूळवड साजरी करण्याचा संदेश दिला. तर इकोफ्रेंडली होळीवर भर द्यावा, असे आवाहन सामाजिक संघटनांनी केले.एकमेकांना गुलाल लावून रंगांची उधळण करणे, सर्वांनी एकत्र येणे, बंधूभाव आणि एकतेचे प्रतीक म्हणून याकडे पाहिले जाते. या दिवशी लोक आपसातील भेदभाव, भांडण, गरिबी-श्रीमंती विसरून एकत्र येतात. लोकांच्या मनात लपलेले मनोविकार होळीच्या दुसऱ्या दिवशी बाहेर काढण्याची संधी असते. होळीचा जल्लोष नागपुरात सुरू झाला असून, लहानांपासून वयस्कांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. होळीचा जल्लोष द्विगुणित करण्यासाठी अनेक कुटुंबीयांनी बुधवारी एकत्रित येऊन ढोलताशाच्या गजरात होलिकेचे दहन केले. गुरुवारी रंगपंचमीचा जल्लोष राहणार असून, रंगांची मनसोक्त उधळण करणार आहेत. अनेकांचा वैयक्तिक तर बहुतांश जणांचा कुटुंबीयांसह रंगपंचमी साजरी करण्याचा बेत आहे.होळीच्या विविधरंगी वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठ सजली आहे. दोन दिवसात पाच कोटींची उलाढाल होत असल्याचा व्यापाऱ्यांचा कयास आहे. देशप्रेम जोपासताना यावर्षी चिनी वस्तूंना नकार देत सर्वांचाच भारतीय बनावटीच्या वस्तू खरेदीवर भर आहे. शिवाय सर्वांचीच नैसर्गिक आणि हर्बल रंगांना पसंती आहे. कलरफूल होळीसाठी विशेषत: युवती आणि महिलांमध्ये उत्साह संचारला आहे. रंगोत्सवाच्या तयारीसाठी तरुणाईने बुधवारीच रंगांची खरेदी केली. नागपुरातील सर्व बाजारपेठांमध्ये मुख्यत्वे इतवारी बाजारात बुधवारी रंग, पिचकाऱ्या, गुलाल, नैसर्गिक आणि हर्बल रंगाच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी होती. यंदा खरेदीदारांनी रासायनिक रंगांना नकार दिला असून, केवळ गुलालाची उधळण करण्यावर सर्वांचा भर आहे.

टॅग्स :Holiहोळीnagpurनागपूर