होळी दहनाचा मुहूर्त सायं. ६.२७ वाजता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2020 11:13 AM2020-03-09T11:13:33+5:302020-03-09T11:14:02+5:30

हिंदू धर्मशास्त्रानुसार होळी पेटविण्याचा सर्वोत्तम काळ संध्याकाळी २ तास २६ मिनिटांचा आहे.

Holi Dahan at on 6.27 pm | होळी दहनाचा मुहूर्त सायं. ६.२७ वाजता

होळी दहनाचा मुहूर्त सायं. ६.२७ वाजता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शरद ऋतूकडून वसंत ऋतूकडे जाण्याचा संधिकाळ म्हणजे होळी होय. हिंदू धर्मशास्त्रानुसार होळी पेटविण्याचा सर्वोत्तम काळ संध्याकाळी २ तास २६ मिनिटांचा आहे. संध्याकाळी ६.२७ ते रात्री ८.५३ वाजतापर्यंत होळी पेटविण्यासाठी उत्तम मुहूर्त आहे. सोमवारी पहाटे ३.०३ वाजतापासून फाल्गुन पौर्णिमेस प्रारंभ होईल आणि रात्री ११.१८ वाजता पौर्णिमा समाप्ती होईल. होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी धुळवड असून, अहोरात्र हा जल्लोष साजरा करता येणार आहे. फाल्गुन पौर्णिमेपासून ते फाल्गुन पंचमी अर्थात शुक्रवार १३ मार्चपर्यंत हा सण साजरा केला जातो.

Web Title: Holi Dahan at on 6.27 pm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी