शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात 'कोरोना'च्या दहशतीत पेटली 'होळी'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2020 21:44 IST

भारतीय संस्कृतीचे अतिशय प्राचीन परंपरा असलेले होलिका दहन ठिकठिकाणी करण्यात आले. पोलीस डायरीच्या नोंदीनुसार शहरातील ५८० जागांवर सामूहिक होळी पेटविण्यात आली.

ठळक मुद्देअधिकृत ५८० ठिकाणी झाले सामूहिक ‘होलिका दहन’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संस्कृतीचे अतिशय प्राचीन परंपरा असलेले होलिका दहन ठिकठिकाणी करण्यात आले. पोलीस डायरीच्या नोंदीनुसार शहरातील ५८० जागांवर सामूहिक होळी पेटविण्यात आली. यावेळी सध्या जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरपासून मुक्ती देण्याची प्रार्थना भाविक नागरिकांनी होलिका देवतेकडे केली.

शरद ऋतूमधील कोरडा गारवा सोडून वसंत ऋतूतील प्रसन्न वातावरणाकडे जाणारी ऋतूसंधी म्हणजे होळी हा सण होय. फाल्गुन पौर्णिमेला पेटविल्या जाणाऱ्या होळीला वाईट वृत्तीवर सत्याचा विजय अशा संदर्भानेदेखील बघितले जाते. त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी सामूहिक होलिका दहन आणि पूजनाचे कार्यक्रम सोमवारी संध्याकाळी आटोपले.
महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, भोसले राजवाडा, बडकस चौक, संघ बिल्डिंग, रेशीमबाग, सक्करदरा, तिरंगा चौक, नंदनवन, उत्तर नागपुरात मानकापूर येथील प्राचीन शिवमंदिर, इतवारी येथे सराफा बाजार, शांतिनगर, कळमना, श्रीकृष्णनगर, रमणा मारोती मंदिर अशा विविध ठिकाणी होलिका दहनाचे कार्यक्रम आटोपले. गृहिणींनी घरी केलेले गोडधोड याचे नैवेद्य होलिका देवतेला अर्पण करीत आयुष्य व आरोग्य वृद्धिंगत होण्याची याचना केली. मुलांनीही या कार्यक्रमाच्या निमित्ताने मोठ्यांकडून होलिका दहनाचा पौराणिक इतिहास जाणून घेतला. काही स्वयंसेवी संस्थांनी होलिकेस अर्पण केल्या जाणाऱ्या नैवेद्यास गोळा करून अनाथाश्रमात पोहोचविण्याचा नवा आणि उपकारक असा नवा पायंडा निर्माण केला. यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचेदेखील आयोजन झाले. काही ठिकाणी संगीताचे तर काही ठिकाणी विनोदी चुटकुल्यांचा कार्यक्रम पार पडला. मंगळवारी धुळवड साजरी होणार आहे. परंतु, होळी पेटताच ठिकठिकाणी एकमेकांवर रंग उधळण्यास सुरुवात झाली होती. काही ठिकाणी घरगुती जेवण आटोपल्यावर रात्रीच्या मैफिलीही रंगल्या. एकूणच वेगवेगळ्या पद्धतीने, शैलीने होलिका दहनाचा सोपस्कार सोमवारी रात्री पार पडला.

टॅग्स :Holiहोळीnagpurनागपूर