पश्‍चिम वर्‍हाडात घटतेय एचआयव्हीचे प्रमाण

By Admin | Updated: July 17, 2014 23:59 IST2014-07-17T22:59:01+5:302014-07-17T23:59:41+5:30

शून्य गाठण्याचा संकल्प : तपासणीसाठी वाढला प्रतिसाद

HIV ratio decreasing in West Ward | पश्‍चिम वर्‍हाडात घटतेय एचआयव्हीचे प्रमाण

पश्‍चिम वर्‍हाडात घटतेय एचआयव्हीचे प्रमाण

बुलडाणा : एचआयव्हीसंदर्भातील भीती दिवसेंदिवस कमी होत चालली असून, एचआअयव्ही चाचणी करून घेण्याकडेही लोकांचा कल वाढता आहे. पश्‍चिम वर्‍हाडात २00८ पासून ८ लाख ८८ हजार ८१४ लोकांनी एचआयव्हीची चाचणी केली असून, पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दरवर्षी कमी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. एड्स निमुर्लनासाठी कार्य करणार्‍या संस्था व व्यक्तींसाठी ही आकडेवारी हुरूप वाढविणारी ठरली आहे.
जागतीक आरोग्य संघटनेने सन २0२0 पर्यंत एड्सचे प्रमाण शुन्यावर आणण्यासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असुन ह्यशून्य गाठायचे आहेह्ण असे घोषवाक्यच दिले आहे. या घोषवाक्याला प्रत्यक्षात आणण्याकरीता जिल्हास्तरावरील एड्स निमुर्लन विभाग प्रामाणिकपणे कामाला लागला असून, एचआयव्हीसंदर्भातील गैरसमज दूर करण्यात, विभाग बर्‍यापैकी यशस्वी झाला आहे. जिल्हा सामान्य रूग्णालये व तालुकास्तरीय केंद्रांवर गर्भवती मातांच्या होणार्‍या तपासणीसोबतच, सामान्य नागरिकही एचआयव्ही चाचणी करून घेण्यात आता संकोच किंवा भीती बाळगत नाही. बुलडाण्यात २00८ पासून मार्च २0१४ पर्यंत ४ लाख १४ हजार ६९ रूग्णांनी अशी तपासणी करून घेतली असून, त्यापैकी ३ हजार १६८ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अकोल्यात ३ लाख २३ हजार ६६९ रूग्णांच्या तपासणीमध्ये ४ हजार १२0, तर वाशीममध्ये १ लाख ५१ हजार ७६ रूग्णांमध्ये १ हजार ८३१ रूग्णांना एचआयव्हीने विळखा घातल्याचे दिसून आले. हे प्रमाण प्रतिवर्षी कमी होत असल्यामुळे एड्स निमुर्लनासाठी कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांना बळ आले आहे.
बुलडाणा जिल्हा एड्स नियंत्रण कक्षाचे कार्यक्रम अधिकारी प्रमोद टाल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी एचआयव्हीबाबत आता व्यापक स्तरावर जनजागृती झाली असून, या आजाराने ग्रस्त व्यक्ती नियमीत औषोधोपचारामुळे सर्वसामान्य आयुष्य जगताना दिसत असल्याचे सांगीतले. एचआयव्हीबाबत वैयक्तिक पातळीवर काळजी घेण्याचे वाढलेले प्रमाणही महत्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

Web Title: HIV ratio decreasing in West Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.