अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:10 IST2021-08-20T04:10:54+5:302021-08-20T04:10:54+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये ...

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दणका
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची १० वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंडाची शिक्षा कायम ठेवली. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आहे.
राकेश मधुकर हागडे (३५) असे आराेपीचे नाव असून, तो खोडशिवनी, ता. सडक अर्जुनी येथील रहिवासी आहे. ५ नोव्हेंबर २०१९ रोजी विशेष सत्र न्यायालयाने आरोपीला १० वर्षे सश्रम कारावास व ३००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. त्या निर्णयाविरुद्ध आरोपीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने ते अपील फेटाळून आरोपीला दणका दिला. ही घटना २८ मार्च २०१५ रोजी घडली होती. त्यावेळी पीडित मुलगी १० वर्षे वयाची होती. त्या दिवशी गावात लग्न असल्यामुळे सर्व जण तिकडे व्यस्त होते. पीडित मुलगीही लग्नाला जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. दरम्यान, आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर मुलगी रडत घरी परतली व तिने आरोपीच्या कुकृत्याविषयी आजीला सांगितले. परिणामी, लगेच डुग्गीपार पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी आराेपीला अटक केली.