इतिहासतज्ज्ञ भा. रा. अंधारे कालवश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:40+5:302021-01-03T04:10:40+5:30

नागपूर : प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. भालचंद्र रामचंद्र अंधारे (८५, रा. भरतनगर) यांचे निधन झाले. विदर्भ आणि नागपूरकर भोसलेंचा राजघराण्याच्या ...

Historian Bha. Ra. In the dark | इतिहासतज्ज्ञ भा. रा. अंधारे कालवश

इतिहासतज्ज्ञ भा. रा. अंधारे कालवश

नागपूर : प्रसिद्ध इतिहासतज्ज्ञ डॉ. भालचंद्र रामचंद्र अंधारे (८५, रा. भरतनगर) यांचे निधन झाले. विदर्भ आणि नागपूरकर भोसलेंचा राजघराण्याच्या इतिहासावर त्यांचा विशेष कटाक्ष होता. त्यांच्यावर अंबाझरी घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, स्नुषा, नातवंडे असा परिवार आहे.

डॉ. भा.रा. अंधारे यांनी विदर्भ आणि भोसले राजघराण्यासोबतच स्वातंत्र्ययुद्धातील क्रांतिकारक, बिटिशांचे विदर्भातील वास्तव्य आणि अन्य बऱ्याच विषयावर आयुष्याच्या अखेरपर्यंत संशोधन केले. ते वसंतराव नाईक इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट्स ॲण्ड सायन्स अर्थात मॉरिश कॉलेजमधून इतिहास विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या प्रयत्नातूनच १९८२मध्ये इतिहास आणि संस्कृती संशोधन केंद्राची स्थापना झाली होती. इतिहासविषयक संशोधनात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन व्हावे, हाच या केंद्राच्या स्थापनेमागचा हेतू होता. अंधारे यांच्या घरीच असलेल्या मीरा अंधारे सांस्कृतिक संग्रहालयात अत्यंत दुर्मिळ पुस्तके, महापुरुषांची हस्तलिखिते, सौंदर्यविषयक साधनांचे कलेक्शन जमविले होते आणि ते त्यांच्या निवासस्थानी असलेल्या संग्रहालयावरून दिसत होते. विशेष म्हणजे, या वस्तूंची पाहणी व माहिती घेण्यास येणाऱ्यांना त्या वस्तूसंबंधी इत्यंभूत माहिती ते देत असत. त्यांच्याकडे इतिहासविषय पुस्तकांचा खजिना होता. विदर्भ आणि भोसले राजघराणेसंदर्भातील पत्र, चित्र, कुंडली, आदेशपत्र, प्रशासनव्यवस्था अहवाल, क्रांतिकारक, ब्रिटिश काळातील पुस्तकांसोबतच ऐतिहासिक गडकोट किल्ल्याचा इतिहास संग्रहित होता. सोबतच पेशवा, शिंदे, होळकर, गायकवाड, सुभेदार, पवार यांच्यासंदर्भातील कलाकुसरी, स्वाक्षरी, साधने, लाकडी नक्षीकाम, कपडे, पेंटिंग्स, दारे, खिडक्या, झुले, हुक्का, ज्वेलरी यांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. लोकमान्य टिळकांचे कपडे, पत्र आदी साहित्यही त्यांच्या संग्रही आहेत. त्यांनी इतिहाससंशोधनावर बरीच पुस्तके व संशोधन संहितांचे लेखन केले. त्यांच्या कार्यासाठी त्यांनी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

Web Title: Historian Bha. Ra. In the dark