शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

दीक्षाभूमीसाठी कला वाहिलेला चित्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 10:34 IST

दिमाखात उभे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धाचे भव्य असे पोर्ट्रेट पाहून कुणालाही प्रसन्न वाटेल. ही आकर्षक आणि भव्यता साकारण्यात कल्पकता आहे ती चित्रकार निळू भगत यांची.

ठळक मुद्देनिळू भगत यांची भीमसेवा अनेक ठिकाणी दिमाखात झळकते कला

निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यासाठी दीक्षाभूमी परिसरात पोहोचल्यानंतर दिमाखात उभे असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत बुद्धाचे भव्य असे पोर्ट्रेट पाहून कुणालाही प्रसन्न वाटेल. ही आकर्षक आणि भव्यता साकारण्यात कल्पकता आहे ती चित्रकार निळू भगत यांची. दीक्षाभूमीतच घडलेल्या आणि वाढलेल्या या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या चित्रकाराने गेल्या ३८ वर्षांपासून आपली कला दीक्षाभूमी आणि आंबेडकरी चळवळीसाठी वाहून घेतली आहे. दरवर्षी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांकडून मिळणारी कौतुकाची दाद यातच आपल्या कलेचे समाधान मानणाऱ्या निळू भगत यांची भीमसेवा अतुलनीय अशीच आहे.धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्याचे औचित्य साधून लोकमतने या कलावेड्या चित्रकाराशी संवाद साधला, तेव्हा अनेक आठवणींना उजाळा मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टी आणि देश-विदेशातून आॅफर्सही मिळाल्या. मात्र ज्या भूमीत त्यांच्यातील उपजत कलेला आकार मिळाला त्या दीक्षाभूमीसाठी आणि प्रेरणा देणारे महामानव बाबासाहेब यांच्या चळवळीसाठीच आपली कला त्यांनी समर्पित केली. निळू भगत यांचा जन्म इमामवाडा वस्तीत झाला. वडील एकनाथ भगत हे एम्प्रेस मिलमध्ये पेंटर पदावर कार्यरत होते. वडिलांचेही आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान राहिले आहे. चळवळीसोबत कलेचाही वारसा वडिलांकडून मिळालेल्या निळू यांनी चित्रकलेचे कोणतेही शिक्षण घेतलेले नाही. प्रसिद्ध चित्रकार प्रमोदबाबू रामटेके व माजी आमदार दीनानाथ पडोळे यांच्या सान्निध्यात आल्यानंतर त्यांच्यातील कलेला आणखी वलय मिळालं.धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमासाठी भव्यदिव्य मंचासह सजावट, पेंटिंग, मोठमोठे कटआऊट तयार करण्याची संधी त्यांना मिळाली आणि त्यांच्यातील कौशल्याचे सर्वत्र कौतुक झाले. तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या कुंचल्यातून आश्चर्यकारक चित्र साकार झाले आहेत. ते अवघ्या काही मिनिटातच हाताने पेंटिंग करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र काढतात.महोत्सवादरम्यान लागणारे मोठे कटआऊट आणि पोर्ट्रेट निळू भगत यांनी काढलेली आहेत.तथागत बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब यांच्या विविध शैलीतील चित्र काढण्याची त्यांना आवड असून, असे असंख्य चित्र त्यांनी कुंचल्यातून सहजपणे रेखाटली आहेत. मुंबईत आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी कार्यक्रमाप्रसंगी रेखाटलेला कटआऊट हा त्यावेळी देशातील सर्वात उंच कटआऊट ठरले होते. रा. सू. गवई बिहारचे राज्यपाल असताना भगत यांना राजभवनामध्ये बौद्ध संस्कृतीची कलाकृती सादर करण्याची संधी मिळाली. त्यांची चित्रे राजभवन व अशोका हॉलसह विविध ठिकाणी दिमाखदारपणे लावण्यात आली आहेत.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर