झिरो माईल ऑडिटसाठी सल्लागार नियुक्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:53 IST2021-02-05T04:53:53+5:302021-02-05T04:53:53+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी येत्या १५ ...

Hire a consultant for Zero Mile Audit | झिरो माईल ऑडिटसाठी सल्लागार नियुक्त करा

झिरो माईल ऑडिटसाठी सल्लागार नियुक्त करा

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सिव्हिल लाईन्स येथील ग्रेड -१ हेरिटेज झिरो माईल संदर्भात स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी येत्या १५ दिवसात सल्लागार नियुक्त करण्याचे निर्देश हेरिटेज संवर्धन समितीने शुक्रवारी दिले. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या उपस्थितीत हेरिटेज संवर्धन समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली.

झिरो माईल व कस्तुरचंद पार्क या दोन्ही हेरिटेजचे व संवर्धन व संरक्षणासाठी लागणारा खर्च हेरिटेज निधी मधून करण्यात येणार आहे. हा संपूर्ण खर्च महापालिका आणि नासुप्र करतील. मनपा आणि नासुप्र द्वारे हेरिटेजचा निधी कुठे व किती खर्च झाला याचा अहवाल १५ दिवसात सादर करण्याचे निर्देश समितीतर्फे देण्यात आले. बैठकीत उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे झिरो माईलचे सौंदर्यीकरण, संवर्धन करण्यासाठी किती जागा उपलब्ध आहे याची माहिती उपलब्ध करण्याचे निर्देश समितीने दिले.

हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य मनपा उपायुक्त मिलिंद मेश्राम, स्ट्रक्चरल अभियंता पी.एस.पाटणकर, एल.ए.डी. महाविद्यालयाच्या प्राचार्या उज्ज्वला चक्रदेव, नागपूर वस्तू संग्राहालयाच्या क्युरेटर जया वाहने, निरीचे संचालक डॉ.तपन चक्रवर्ती, हेरिटेज संवर्धन समितीचे सदस्य सचिव तथा सहाय्यक संचालक नगररचना हर्षल गेडाम, नासुप्रच्या अधीक्षक अभियंता लीना उपाध्ये, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जनार्दन भानुसे, तहसीलदार (नझुल) सीमा गजभिये, वास्तुविशारद अर्बन डिझायनर अशोक मोखा, माहिती विभागाचे अनिल गडेकर, मनपाचे जनसंपर्क अधिकारी मनीष सोनी आदी उपस्थित होते.

Web Title: Hire a consultant for Zero Mile Audit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.