हिंगणा पाेलिसांनी लावला चाेरीच्या माेबाईलचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:10 IST2021-06-09T04:10:51+5:302021-06-09T04:10:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क हिंगणा : चाेरीला गेलेल्या २०० वर माेबाईल हॅण्डसेटचा छडा लावत पाेलिसांनी ते संबंधित व्यक्तींना परत केले. ...

हिंगणा पाेलिसांनी लावला चाेरीच्या माेबाईलचा छडा
लाेकमत न्यूज नेटवर्क
हिंगणा : चाेरीला गेलेल्या २०० वर माेबाईल हॅण्डसेटचा छडा लावत पाेलिसांनी ते संबंधित व्यक्तींना परत केले. हिंगणा पाेलिसांच्या या स्तुत्य कामगिरीचे अनेकांनी काैतुक केले.
हिंगणा पाेलीस ठाण्यात शब्बीर बगरवार, श्रावण समर्थ, राजेंद्र काेठे, विवेक कुंभारे, शुभम गजभिये, कुणाल चरडे, सामील संतापे, धनराज येलेकर, अमाेल डडमल, वर्षा ठवकर, पिंकू ठाकूर, ऋषिकेश चाैधरी, बबली रामटेके, भारत गाैहाडे, संदीप मागर्डे, जयकुमार टेंभरे, शैलेश उंदिरवडे, आशिष आहाके, शुभम पंधराम आदींनी माेबाईल चाेरीबाबत तक्रार नाेंदविली हाेती. दरम्यान, पाेलिसांना चाेरीच्या माेबाईलचा शाेध लावण्यात यश आले. त्यानुसार पाेलिसांनी सर्वांना मंगळवारी पाेलीस ठाण्यात बाेलावून त्यांचे माेबाईल हॅण्डसेट परत केले. चाेरीला गेलेले माेबाईल परत मिळाल्याने तक्रारकर्त्यांनी समाधान व्यक्त केले.
हिंगणा पाेलिसांनी शाेध माेहीम राबवून आतापर्यंत चाेरीला गेलेले २०० वर माेबाईल हॅण्डसेटचा छडा लावला आहे. यातील माेबाईल हॅण्डसेट १२ ते २५ हजार रुपये किंमतीचे असून, गाेंदिया, वर्धा व अमरावती येथून हे माेबाईल हॅण्डसेट जप्त केल्याचे पाेलिसांनी सांगितले. पाेलीस निरीक्षक सारीन दुर्गे यांच्या मार्गदर्शनात हवालदार रवींद्र नेतानराव, कमलेश साहू, अश्विन चाैधरी यांनी ही कामगिरी यशस्वी पार पाडली.