आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचा हिंदू सप्ताह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:07 IST2021-06-26T04:07:41+5:302021-06-26T04:07:41+5:30

नागपूर : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात लोकमत चौक येथे हिंदू सप्ताहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी विदर्भ ...

Hindu Week of International Hindu Council | आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचा हिंदू सप्ताह

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचा हिंदू सप्ताह

नागपूर : आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेच्या तिसऱ्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात लोकमत चौक येथे हिंदू सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

यावेळी विदर्भ प्रांतमंत्री किशोर दिकोंडवार, राष्ट्रीय बजरंग दलचे जिल्हाध्यक्ष विवेक चकोले उपस्थित होते. यावेळी दिकोंडवार यांच्या हस्ते श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. ३० जूनपर्यंत हिंदू सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन होत असल्याची माहिती संघटनेचे सहमंत्री प्रसाद काठीकर यांनी दिली. त्यात रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, धार्मिक स्थळांची स्वच्छता, कोरोना योद्धा सन्मान अशा उपक्रमांचा समावेश आहे. यावेळी महानगर उपाध्यक्ष योगेश गायकवाड, जिल्हाध्यक्ष वैभव कपूर, प्रशांत साहू, समरिन पात्रा, शुभम जैन, निखिल वैश्य, रोहित चांदेकर, अक्षय चौधरी, ओम चौहान, अशोक पालकर, प्रवीण झुनझुनकर उपस्थित होते.

...............

Web Title: Hindu Week of International Hindu Council