'सॉरी मम्मी, सॉरी पप्पा' म्हणत हिमांशूने आठव्या माळ्यावरून घेतली उडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2022 10:23 PM2022-07-23T22:23:03+5:302022-07-23T22:24:35+5:30

Nagpur News बारावीच्या परीक्षेत अपयश आल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे गणेशपेठमधील श्रद्धा मंगलम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हिमांशू धनराज कलंत्री (१८) या विद्यार्थ्याने आठव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

Himanshu jumped from the eighth floor saying 'sorry mummy, sorry papa' | 'सॉरी मम्मी, सॉरी पप्पा' म्हणत हिमांशूने आठव्या माळ्यावरून घेतली उडी

'सॉरी मम्मी, सॉरी पप्पा' म्हणत हिमांशूने आठव्या माळ्यावरून घेतली उडी

googlenewsNext
ठळक मुद्देबारावीत अपयश आल्याने आत्महत्यागणेशपेठच्या श्रद्धा मंगलम अपार्टमेंटमधील घटना

नागपूर : बारावीच्या परीक्षेत अपयश आल्याचा धक्का सहन न झाल्यामुळे गणेशपेठमधील श्रद्धा मंगलम अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या हिमांशू धनराज कलंत्री (१८) या विद्यार्थ्याने आठव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या धक्कादायक घटनेमुळे हिमांशूंचे कुटुंबीयच नव्हे, तर परिसरातील नागरिक हादरले.

हिमांशू बारावी सीबीएसईला शिकत होता. शुक्रवारी बारावीचा निकाल लागला आणि त्यात तो नापास झाला. नापास झाल्याचे समजताच हिमांशू खूप दु:खी झाला. तो संवेदनशील असल्यामुळे त्याचे वडील धनराज सत्यनारायण कलंत्री, त्याची आई आणि मोठ्या बहिणीने त्याची समजूत घातली. नैराश्यात हिमांशूने टोकाचे पाऊल उचलू नये यासाठी आईवडील शुक्रवारी रात्री हिमांशूला सोबत घेऊन झोपले. शनिवारी सकाळी झोपेतून उठल्यानंतर आईवडील कामात असताना हिमांशूने सुसाईड नोट लिहिली. त्यात सॉरी मम्मी, सॉरी पप्पा, सॉरी जीजी मला माफ करा; नापास झाल्यामुळे मी सुसाईड करीत असल्याचा उल्लेख केला. हिमांशूचे कुटुंबीय श्रद्धा मंगलम अपार्टमेंटच्या तिसऱ्या माळ्यावर राहतात. सुसाईड नोट लिहिल्यानंतर हिमांशू आठव्या माळ्यावरील टेरेसवर गेला. तेथून त्याने खाली उडी मारली. अपार्टमेंटच्या गेटजवळ काही अंतरावर तो खाली कोसळला.

हिमांशूने उडी मारल्याचे समजताच त्याच्या आईवडिलांच्या पायांखालील वाळू सरकली. त्यांनी हिमांशूला धंतोली येथील खासगी रुग्णालयात नेले; परंतु डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच अपार्टमेंटमधील रहिवासी जमा झाले. त्यांनी हिमांशूच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी गणेशपेठचे पोलीस उपनिरीक्षक मनीष गोडबोले यांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास सुरू केला आहे.

मोठ्या बहिणीचा वाढदिवस केला नाही साजरा

हिमांशूची मोठी बहिणी सी.ए. करीत आहे. शुक्रवारी तिचा वाढदिवस होता; परंतु बारावीच्या परीक्षेत हिमांशू नापास झाल्यामुळे आणि तो तणावात असल्यामुळे कुटुंबीयांनी तिचा वाढदिवसदेखील साजरा केला नाही. दिवसभर कलंत्री कुटुंबीय हिमांशूंची समजूत काढत त्याच्यासोबतच होते.

...........

Web Title: Himanshu jumped from the eighth floor saying 'sorry mummy, sorry papa'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Deathमृत्यू