शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

महामार्ग बनले मृत्यूचे सापळे, ९ महिन्यांत १४०० हून अधिक अपघात; ८३२ नागरिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2017 20:56 IST

महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १४०० हून अधिक अपघात झाले. यात ८२५ हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे.

नागपूर - महामार्ग पोलिसांच्या नागपूर विभागांतर्गत राज्य व राष्ट्रीय महामार्गांवर २०१७ मधील पहिल्या ९ महिन्यांत थोडेथोडके नव्हे तर १४०० हून अधिक अपघात झाले. यात ८२५ हून अधिक नागरिकांचा जीव गेला आहे. अपघातांची सरासरी काढली असता दिवसाला ५ अपघात झाले असून यात ३ लोकांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग आहे की मृत्यूचा मार्ग असे म्हणण्याची वेळ आली आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपूर महामार्ग पोलीस प्रादेशिक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. २०१७ मध्ये विभागाच्या हद्दीत किती अपघात झाले , किती लोकांचा अपघातात मृत्यू झाला, या पोलिसांची संख्या किती होती, इत्यादी प्रश्न त्यांची विचारले होते. प्राप्त झालेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते ३० सप्टेंबर २०१७ या कालावधीत महामार्गांवर १४४१ अपघात झाले. यात ८३२ नागरिकांचा मृत्यू झाला तर १०१५ जण जखमी झाले. बहुतांश अपघात हे वाहनचालकांचा हलगर्जीपणा, भरधाव वेग, ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न, नशा करून वाहन चालविणे, नियमांचा भंग करणे या कारणांमुळे झाले. या अपघातांत ११ पोलीस कर्मचाºयांचादेखील मृत्यू झाला.

‘ट्रक’ सर्वात धोकादायकमहामार्गांवर झालेल्या अपघातांमध्ये सर्वात जास्त अपघात ट्रकचे झाले आहेत. ९ महिन्यांच्या कालावधीत ट्रक्सचे ३५१ अपघात झाले. बसमुळे झालेल्या अपघातांची संख्या ५७ तर कारच्या अपघातांची संख्या १५१ इतकी आहे. या तिन्ही वाहनांच्या अपघातांमध्ये ३६९ जणांचा बळी गेला.

‘एपीआय’, ‘पीएसआय’च्या ८१ टक्के जागा रिक्तनागपूर प्रादेशिक विभागांतर्गत ‘एपीआय’ व ‘पीएसआय’ची एकूण ४८ मंजूर पदे आहेत. यापैकी केवळ ६ ‘एपीआय’ व ३ ‘पीएसआय’ नियुक्त असून ३९ जागा रिक्त आहेत. 

प्रमुख मार्गांवर झालेले अपघातमार्ग                अपघात        मृत्यू        जखमीनागपूर-अमरावती    ४१            १८        २८नागपूर-चंद्रपूर        २८०            १६०        १६७नागपूर-यवतमाळ    २५            २५        २५नागपूर अकोला        ९३            ४२        १२९ 

टॅग्स :highwayमहामार्गAccidentअपघात