महामानवास अभिवादन

By Admin | Updated: December 7, 2015 06:40 IST2015-12-07T06:40:09+5:302015-12-07T06:40:09+5:30

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी शासन आणि विविध राजकीय

Highway greetings | महामानवास अभिवादन

महामानवास अभिवादन

नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रविवारी शासन आणि विविध राजकीय पक्षांसह अनेक संघटनांतर्फे भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. यावेळी दीक्षाभूमी व संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नागरिकांनी अभिवादन केले.
केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी सकाळी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्यासोबत महापौर प्रवीण दटकेसुद्धा होते. दरम्यान माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीसुद्धा डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
भाजप अनुसूचित जाती मोर्चा
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी शहराध्यक्ष आ. कृष्णा खोपडे, महापौर प्रवीण दटके, आ. सुधाकर देशमुख, अनु.जाती मोर्चाचे शहराध्यक्ष धर्मपाल मेश्राम, सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, अशोक मेंढे, सतीश सिरसवान, अ‍ॅड. राहुल झांबरे, गौरीशंकर ग्रावकर, संजय कठाळे, विक्की कुकरेजा, राजकुमार केवलरामानी, सुनील सिरसाट आदी उपस्थित होते.
बहुजन रिपब्लिकन एकता मंच
बहुजन रिपब्लिकन एकता मंचतर्फे मंचच्या संस्थापिका माजी राज्यमंत्री अ‍ॅड. सुलेखा कुंभारे यांच्या नेतृत्वात संविधान चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी भीमराव फुसे, सुधीर लांडगे, तिलक गजभिये, महेंद्र थुल, अशोक नगरारे, भरत जवादे, अरविंद वाळके, वंदना भगत, नंदा गोडघाटे आदी उपस्थित होते.
नागपूर शहर काँग्रेस कमिटी
कमिटीतर्फे घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त झिरो माईल येथून पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. संविधान चौकात पदयात्रेचा समारोप झाला. चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला शहर काँग्रेस कमिटीतर्फे माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री उल्हास पवार, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, डॉ. सतीश चतुर्वेदी, डॉ. अनिस अहमद, शहर अध्यक्ष विकास ठाकरे, कृष्णकुमार पांडे, मुन्ना ओझा, प्रशांत धवड, प्रफुल्ल गुडधे, अनंतराव घारड, रामगोविंद खोब्रागडे, डॉ. गजराज हटेवार, सूर्यकांत भगत, बंडोपंत टेंभूर्णे, कमलेश समर्थ, विजय बाभरे आदी उपस्थित होते.
राष्ट्रीय समाज पक्ष
राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मिलिंद खैरकर यांच्या उपस्थितीत व जिल्हाध्यक्ष श्रीकृष्ण मते यांच्या हस्ते संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राजेंद्र पाटील, प्रशांत माहेश्वरी, अभिजित श्रीगिरीवार, मनोज निनावे, मनोहर चौधरी, दत्ता मेश्राम, आतिष तिरपुडे, राजू खैरकर, जगदीश गावंडे, अ‍ॅड. अनिल पाल, प्रफुल्ल हलमारे आदी उपस्थित होते.
बहुजन परिवहन अधिकारी-कर्मचारी संघटना
संघटनेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ आढाव यांच्या हस्ते मध्यवर्ती बसस्थानक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपस्थित प्रादेशिक सचिव अशोक पवार, संदीप गोडबोले, राजेंद्र मेंढे, प्रफुल्ल खडसे, राजू चौधरी, विजय वाघमारे, अशोक खडसे, उमेश पेटकर, बी.एस. मोहोड, व्ही.एच. गणवीर, सुरेश गोहाणे, अरविंद जवादे, घनश्याम लोखंडे, योगेश वाहूरवाघ यांनी महामानवाला मानवंदना देऊन आदरांजली अर्पण केली.
हायकोर्ट बार असोसिएशन
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील, अ‍ॅड. शशिभूषण वाहणे, अ‍ॅड. राजेंद्र पाटील, सरकारी वकील भगवान लोणारे, अ‍ॅड. शैलेश नारनवरे, अ‍ॅड. संजयकुमार पाटील यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.
महाराष्ट्र आॅफिसर्स फोरम
फोरमतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी सनदी अधिकारी ई.झेड. खोब्रागडे, टी.बी. देवतळे, सच्चिदानंद दारुंडे, शिवदास वाझे, विलास सुटे, व्ही.व्ही. मेश्राम, अरुण भगत, पी.आर. पुडके, मिलिंद बनसोड उपस्थित होते.
बहुजन समाज पार्टी
बहुजन समाज पार्टीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम संविधान चौकात आयोजित करण्यात आला होता. पक्षाचे मीडिया प्रदेश प्रभारी सागर डबरासे यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून, अभिवादन केले. यावेळी उपाध्यक्ष कृष्णा बेले, महासचिव जितेंद्र म्हैसकर, मंडळ प्रभारी विवेक हाडके, पृथ्वी शेंडे, जिल्हाध्यक्ष नागोराव जयकर, प्रफुल्ल मानके, चंद्रशेखर कांबळे, महेश सहारे, गौतम पाटील, नितीन सिंगाडे, तपेश पाटील, जितेंद्र घोडेस्वार, प्रशांत पाईक, प्रा. सुनील कोचे आदी उपस्थित होते.
शासकीय मनोरुग्णालय
शासकीय प्रादेशिक मनोरुग्णालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी उपवैद्यकीय अधिक्षक डॉ. नितीन गुल्हाने यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. कार्यक्रमाला डॉ. दाणी, डॉ. रीना बचाले, टेकाम, पवार यांच्यासह रुग्णालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. गुल्हाने यांनी बाबासाहेबांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
अ.भा. रिपब्लिकन पक्ष
पक्षातर्फे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिझर्व्ह बँकेसमोरील पुतळ्यास मानवंदना देऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस अमृतराव गजभिये यांच्याहस्ते माल्यार्पण करण्यात आले. यावेळी सुधाकर टवळे, धर्माजी बागडे, परमेश्वर मनवर, अशोक बन्सोड, गोविंद महत्तो, कृष्णा पाटील, धनराज शेंडे, बाबाराव इंगोले, मिलिंद मेश्राम, हिरालाल बोरकर, सिद्धार्थ पाटील, रमा वासनिक, अ‍ॅड. सोनिया गजभिये आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग, युवा नेते सलील देशमुख, प्रवीण कुंटे, महेंद्र भांगे, अनिल अहिरकर, राजाभाऊ ताकसोड, दिलीप पनकुले, राजू नागुलवार, संदीप मेंडे, भास्कर मोहोड, राजकुमार तांडेकर, विनोद हेडाऊ, पंकज हुमणे, सतीश तांबे, राजू सोमकुवर, चरणजित सिंग, दिनकर वानखेडे, सुखदेव वंजारी, संजय शेवाळे, राजेश अवध, संकेत भैसारे आदी उपस्थित होते.
अथर्व बहुउद्देशीय ग्रामीण विकास संशोधन व प्रशिक्षण संस्था
रामबाग कॉलनी येथील संस्थेच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनीष पाटील यांच्याहस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. विवेक वैरागडे, जितेंद्र चव्हाण, सुमेध आवळे, कांता चव्हाण व कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मागासवर्गीय इतर मागासवर्गीय पाणीपुरवठा कर्मचारी अभियंता संघटना
संघटनेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. देवेंद्र लांडगे यांनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल माहिती दिली. राजेश हाडके यांनी बाबासाहेबांच्या संघर्षाचा अनुभव करून दिला. कार्यक्रमाला प्रशांत दासरवार, संदीप हेडाऊ, विजय हिवसे, बी.जी. कु मरे, अरविंद मानकर, प्रवीण मेहर, भोजराज शिंगाडे, महेंद्र उके आदी उपस्थित होते.
सेवाभावी मंदा बहुउद्देशीय
समाज विकास संस्था
संस्थेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रिझर्व्ह बँकेसमोरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यात माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंदाताई वैरागडे, कल्पना शिंदे, तृप्ती पांडे, आरती रंगारी, माधुरी आठवले उपस्थित होते.
बहुजन हिताय संघ
बहुजन हिताय संघ नागपूरच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान चौकातील पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी डॉ. शंकर खोब्रागडे, अशोक शंभरकर, शशिकांत हुमणे, अ‍ॅड. हंसराज भांगे, भास्कर उके, पुरेश बोरकर, शंकर महेशकर, सुधीर मेश्राम, बी.टी. वाहाणे, ए.एच. वासनिक, विजय नगरकर, परमानंद रामटेके, भगवान पाटील, मोरेश्वर मलके, भीमराव मेश्राम उपस्थित होते.
घोगली परिसर उत्सव समिती
समितीच्या वतीने स्वामीधाम नगरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महिला संघाने बुद्धवंदना केली. कार्यक्रमाला पिपळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच किशोर वानखेडे, राजेश सोनटक्के, मधुकर सुरवाडे, जितेन वासनिक, नारायण राऊत, रंजना बोरकर उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी, उत्तर नागपूर
उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद माने यांच्यातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अविनाश धमगाये, नवनीत बेहेरे, विजय केवलरामानी, बबली मेश्राम, ज्योती जनबंधू, प्रेम गजभिये, प्रवीण पाटील, शेषराव गोतमारे, प्रकाश वानखेडे, रवींद्र धुर्वे आदी उपस्थित होते.

धम्मदीप बहुउद्देशीय सांस्कृतिक मंडळ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ५९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त संस्थेच्या वतीने यादवनगर हाऊसिंग बोर्ड कॉलनी येथील कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जितेंद्र चव्हाण यांच्याहस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. प्रसंगी रमेश जनबंधू, अलका डोंगरे, सुनील धामगाये, अविनाश लाडे, सुनील शंभरकर, वंदना साखरे, अनिता अंबादे आदींनी श्रद्धांजली अर्पण केली.
रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया
विदर्भ उपाध्यक्ष विकास गणवीर यांच्याहस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी कांतीलाल पखीड्डे, प्रा. पवन गजभिये, सतीश तांबे, राजेश ढेंगरे, हरीश लांजेवार, वनदेव डोरले, बलवंत मंडपे, प्रेमचंद बनकर, स्वप्निल घुटके, प्रतिभा रामटेके, बाळु हाडके, सतीश रामटेके, रमा वासनिक आदी उपस्थित होते.
नॅशनल पीपल्स सोशल आॅर्गनायझेशन
संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष राजेश ढेंगरे, नगरसेविका सुजाता कोंबाडे, डॉ. दिलीप सुखदेवे, गौतम ढोंगरे, डॉ. विठ्ठलराव कोंबो, डॉ. अनिल हिरेखण, आदी उपस्थित होते.
एससीएस गर्ल्स हायस्कूल अ‍ॅण्ड ज्युनिअर कॉलेज
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शाळेतर्फे अभिवादन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अ‍ॅड. आनंद जीभकाटे यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून रॅलीचा शुभारंभ केला. संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या अभिवादन रॅलीप्रसंगी व्यवस्थापक मंडळाचे सचिव प्रा. पवन गजभिये, वत्सला मेश्राम उपस्थित होते.
कास्ट्राईब कर्मचारी महासंघ
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने कास्ट्राईब कर्मचारी महासंघाच्या वतीने विनम्र अभिवादन करण्यात आले. संविधान चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला महासंघाचे अध्यक्ष कृष्णा इंगळे यांनी माल्यार्पण करून आदरांजली अर्पण केली. यावेळी सत्यदेव रामटेके, डॉ. बाळासाहेब बन्सोड, परशराम गोंडाणे, डॉ. चंद्रसेन गोंडाणे, एन.डी. गायकवाड, प्रबोध धोंगडे, डॉ. सुभाष गायकवाड, व्ही. एस. चव्हाण, अरविंद गणवीर, राहुल बागडे, बबनराव ढाबरे, दिलीप चौरे, मनोज बारसागडे, संदेश आगलावे, राजकुमार रंगारी, जगन्नाथ सोरते, नरेंद्र धनविजय, रामेश्वर वाघ, राहुल सोमकुवर, दीपक सातपुते, धनराज राहुलकर, धैर्यशील वाघमारे आदी उपस्थित होते.

Web Title: Highway greetings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.