शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री! आजपासून तिकीट दरवाढ लागू; जाणून घ्या तुमचे तिकीट किती रुपयांनी महागले?
3
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
5
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
6
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
7
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
8
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
9
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
10
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
11
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
12
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
13
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
14
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
15
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
16
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
17
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
18
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
19
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
20
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूचा महामार्ग कामठी

By admin | Updated: June 25, 2014 01:21 IST

वाहतूक नियमांचे पालन होते किंवा नाही, यावर देखरेख करण्याचे काम वाहतूक पोलीस विभागाचे आहे. वाहतूक नियमांचे पालन जितके कार्यक्षम राहील तितकी अपघातांची संख्या कमी राहील.

पोलिसांच्या नजरेखाली : रोज ३०० वाहनांतून अवैध प्रवासी वाहतूक नागपूर : वाहतूक नियमांचे पालन होते किंवा नाही, यावर देखरेख करण्याचे काम वाहतूक पोलीस विभागाचे आहे. वाहतूक नियमांचे पालन जितके कार्यक्षम राहील तितकी अपघातांची संख्या कमी राहील. मात्र नागपुरात उलट स्थिती आहे. विशेषत: एकट्या कामठी मार्गावर वाहतूक पोलिसांच्या नजरेखाली अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. टाटा मॅजिक, अ‍ॅपे, सहा सीटर अशा ३०० वाहनातून ही अवैध वाहतूक बिनधास्त सुरू आहे. विशेष म्हणजे हा मार्ग गांधीबाग आणि इंदोरा पोलीस वाहतूक विभागाच्या अंतर्गत येतो. यातील एकट्या इंदोरा विभागात मागील १४ महिन्यांत या मार्गावर ५७ अपघात झाले. यात ५१ जण जखमी तर तब्बल २१ जणांना प्राणाला मुकावे लागले आॅल इंडिया परमिट असलेल्या १०० वर मॅजिक गाड्या कामठी रोडवर रोज अवैध प्रवासी घेऊन धावतात. सहा सीटस्ची परवानगी असताना १५-२० प्रवासी बसवून भन्नाट वेगाने ही वाहने धावतात. नियमानुसार या वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही व्हेरायटी चौक ते कामठी मार्गावरील सर्व चौकांतून प्रवासी घेताना दिसून येतात. एलआयसी चौकात तर यांचा स्टॅण्ड आहे. पोलिसांसमोर ही वाहतूक सुरू असतानाही कारवाई नावापुरतीच असल्याचे चित्र आहे. सहा सीटर आॅटोरिक्षाच्या संदर्भात कठोर नियम आहेत. या वाहनाला शहरामधून प्रवासी घेण्यावर प्रतिबंध आहे. असे असतानाही शहर सीमेच्या आत कामठी रोडवरील सर्वच चौकातून प्रवाशांनी भरलेली वाहने दिसतात. यातील बहुसंख्य वाहने १६ वर्षांवरील आहेत.सात हजाराच्या ‘मॅजिक’कामठी रोडवर धावत असलेल्या शंभर ‘मॅजिक’ या दरमहा सात हजार रुपये हप्ता देतात. यातील एका चालकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले की, हा हप्ता दिल्याशिवाय या मार्गावर वाहन चालूच शकत नाही. गोलू नावाचा एक गुंड हा हप्ता जमा करतो. त्याचे एका आमदारासोबत सेटिंग आहे.या हप्त्याची मोठी रक्कम इंदोरा, मीठानीम दर्गा आणि गिट्टीखदान वाहतूक पोलीस विभागाला जाते, म्हणून या मार्गावर कोणीच थांबवीत नाही. जे हप्ता देत नाही त्यांच्यावरच गारपीट होते. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य वाहने ही नॉन ट्रान्सपोर्टमध्ये नोंदणी झालेली आहेत. सहा सीटरसाठी तीन हजाराचा हप्ता नागपूर-कामठी मार्गावर सुमारे १०० सहा सीटर आॅटोरिक्षा धावतात. यातील बहुसंख्य सहा सीटर आॅटोरिक्षा विनापरमीटच्या आहेत. नियमानुसार शहराच्या आत त्यांना प्रवासी घेता येत नाही, तरीही व्हेरायटी चौक ते कामठी अशी बिनबोभाट प्रवासी वाहतूक सुरू असते. यामागील गुपित म्हणजे तीन हजाराचा मासिक हप्ता असल्याचे एका सहा सीटर चालकाने नाव न लिहिण्याच्या अटीवर सांगितले. तो म्हणाला, गांधीबाग व इंदोरा वाहतूक पोलीस विभाग मिळून हा हप्ता दिला जातो. कमरूबाबा नावाचा एक गुंड हा हप्ता गोळा करतो. अधिकार असताना निलंबनाची कारवाईच नाहीनॉन ट्रान्सपोर्ट म्हणून नोंद असताना प्रवासी वाहतूक करणे हा गुन्हा आहे. तसेच शहरात धावत असलेल्या सर्वच सहा सीटर १६ वर्षांवरील आहे. वाहतूक पोलिसांना त्यांच्यावर निलंबनाची कारवाईचे अधिकार आहेत. मात्र सूत्रानुसार आतापर्यंत एकाही मॅजिक किंवा सहा सीटरवर निलंबनाची कारवाई झालेली नाही. इतर जिल्ह्यातीलही अवैध वाहने याच मार्गावरकोणीही यावे आणि व्यवसाय सुरू करावा, असा कामठी मार्ग आहे. भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा येथे नोंदणी झालेल्या ‘मॅजिक’ गाड्या या मार्गावर व्यवसाय करतात. (प्रतिनिधी)