विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद :  ८,०१२ नवे रुग्ण, ९१ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 10:24 PM2021-04-02T22:24:02+5:302021-04-02T22:25:21+5:30

Highest number of patients recorded in Vidarbha विदर्भाच्या चिंतेत शुक्रवारी मोठी भर पडली. ८,०१२ दैनंदिन रुग्णसंख्येची विक्रमी नोंद झाली. ९१ रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यासह भंडारा व वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले.

Highest number of patients recorded in Vidarbha: 8,012 new patients, 91 deaths | विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद :  ८,०१२ नवे रुग्ण, ९१ मृत्यू

विदर्भात सर्वाधिक रुग्णसंख्येची नोंद :  ८,०१२ नवे रुग्ण, ९१ मृत्यू

Next
ठळक मुद्देनागपुरात ४,१०८ रुग्ण, ६० मृत्यू, भंडाऱ्यात ७९३, बुलडाण्यात ६६५ रुग्ण

लोकमत  न्यूज  नेटवर्क

नागपूर : विदर्भाच्या चिंतेत शुक्रवारी मोठी भर पडली. ८,०१२ दैनंदिन रुग्णसंख्येची विक्रमी नोंद झाली. ९१ रुग्णांचे बळी गेले. नागपूर जिल्ह्यासह भंडारा व वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले. नागपूर जिल्ह्यात ४,१०८ रुग्ण व सलग दुसऱ्या दिवशी ६० रुग्णांचे बळी गेले. भंडारा जिल्ह्यातही कोरोना रुग्णसंख्येचे जुने विक्रम मोडित निघाले. ७९३ रुग्ण व ३ रुग्णांचे जीव गेले. वर्धा जिल्ह्यात ३९९ रुग्ण व ५ मृत्यू नोंदविण्यात आले. बुलडाणा जिल्ह्यात ६६५ रुग्ण व ५ रुग्णांचा मृत्यू झाला. यवतमाळ जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढताना दिसून येत आहे. ५४५ रुग्ण व ७ रुग्णांचे जीव गेले. अकोला जिल्ह्यात ३१७ रुग्ण व ४ मृत्यू, वाशिम जिल्ह्यात ३०१ रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात २९७ रुग्ण व २ मृत्यू, अमरावतीत २७५ रुग्ण व ४ मृत्यू तर, गोंदिया जिल्ह्यात २०९ रुग्णांची नोंद झाली. विशेष म्हणजे, गडचिरोली जिल्ह्यातही आज सर्वाधिक १०३ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

नागपूर : ४,१०८ : ६०

गडचिरोली : १०३ : ००

चंद्रपूर : २९७ : ०२

गोंदिया : २०९ : ०१

भंडारा : ७९३ : ०३

वर्धा : ३९९ :०५

यवतमाळ : ५४५ : ०७

बुलडाणा : ६६५ : ०५

वाशिम : ३०१ : ००

अकोला : ३१७ : ०४

अमरावती : २७५ : ०४

Web Title: Highest number of patients recorded in Vidarbha: 8,012 new patients, 91 deaths

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.