शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

'ब्रेकअप'नंतरचा हाय वोल्टेज ड्रामा ! गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलासोबत जवळीक सहन न झाल्याने वाहनांची केली तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 17:40 IST

Nagpur : मंगळवारी रात्रीच्या सुमारास महाल परिसरात सशस्त्र तरुणांनी घातलेला गोंधळ व वाहनांची तोडफोड याच्या कारणांचा उलगडा झाला आहे. एका तरुणीशी ब्रेकअप झाल्याच्या संतापातून एका तरुणाने साथीदारांच्या मदतीने हा गोंधळ घातला.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मंगळवारी रात्रीच्या सुमारास महाल परिसरात सशस्त्र तरुणांनी घातलेला गोंधळ व वाहनांची तोडफोड याच्या कारणांचा उलगडा झाला आहे. एका तरुणीशी ब्रेकअप झाल्याच्या संतापातून एका तरुणाने साथीदारांच्या मदतीने हा गोंधळ घातला. या प्रकारामुळे मध्यरात्रीनंतरदेखील महालात तणाव कायम होता. आश्चर्याची बाब म्हणजे संवेदनशील भाग असूनदेखील शिवाजी पुतळा चौक परिसरात मर्यादित पोलिस कर्मचारी होते व अधिकाऱ्यांना महालातील रहिवाशांकडून या प्रकाराची माहिती मिळाली. पोलिसांनी सात अल्पवयीन मुलांसह नऊ जणांना ताब्यात घेतले आहे.

महालातील शिवाजी पुतळा चौकाकडून राम कूलर्स चौकाकडे जाणारा मार्ग व आतील भागांत हा प्रकार घडला. १२ ते १५ अज्ञात तरुण हातात शस्त्रे घेऊन शिवीगाळ करीत रस्त्यावरून जात होते. जोहरीपुऱ्याकडून ते राम कूलर चौकाकडे गेले. त्यांनी परिसरातील मार्गावर उभ्या असलेल्या वाहनांचीदेखील तोडफोड केली. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार जवळपास डझनाहून अधिक वाहने फोडण्यात आली. परिसरातील लोकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली. 

पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. सोबतच उपायुक्त राहुल मदने हेदेखील तेथे पोहोचले. महालातील विविध भागांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींच्या शोधाला सुरुवात झाली. पोलिसांनी नंदनवन झोपडपट्टीतील स्वरूप डोंगरे (१९) व ऋषभ राजेश खरे (१९, वैष्णोदेवीनगर, वाठोडा) यांच्यासह सात अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.

दुसऱ्याच मुलीच्या घरात शिरले आरोपी

नंदनवन येथील रहिवासी मंगेश नावाच्या तरुणाने इन्स्टाग्रामवर एका मुलीशी मैत्री केली होती. मंगेशचे वाईट वर्तन लक्षात घेता तिने त्याच्याशी संबंध तोडले. तिने दुसऱ्या मुलाशी जवळीक केल्याची माहिती मिळताच मंगेश संतापला. मंगळवारी रात्री ११ वाजता मंगेश १५ हून अधिक तरुणांसह गांधी गेटजवळ पोहोचला. लाठ्या व शस्त्र घेऊन हल्लेखोर मुलीच्या घराचा शोध घेण्यासाठी जोहरीपुरात घुसले. हल्लेखोर प्रथम दुसऱ्याच घरात शिरले. कुटुंबाला धमकावताना त्यांना त्यांची चूक लक्षात आली आणि ते परतले. त्यांनी कॉलनीत उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली आणि ये-जा करणाऱ्यांना शिवीगाळ करून धमकावू लागले. या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आणि कॉलनीतील रहिवासी घराबाहेर पडले. परिसरातील रहिवासी ८५ वर्षीय नथुजी आकरे यांनी हल्लेखोरांना तोडफोड का करत आहात अशी विचारणा केली असता त्यांना हल्लेखोरांनी जिवे मारण्याची धमकी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Breakup Fury: Vehicles Vandalized After Girlfriend's Closeness With Another Man

Web Summary : Nagpur: Angered by his breakup and his ex-girlfriend's new relationship, a young man and his accomplices vandalized vehicles in Mahal. Police arrested nine individuals, including seven minors, after the late-night rampage caused tension in the area. The incident stemmed from a dispute after the girl ended contact due to the boy's behavior.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर