फ्लॅटमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

By Admin | Updated: August 11, 2016 02:05 IST2016-08-11T02:05:53+5:302016-08-11T02:05:53+5:30

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कोराडीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेला देह व्यापाराच्या ‘हाय प्रोफाईल’ अड्ड्यावर धाड टाकली.

High profile sex racket in flat | फ्लॅटमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

फ्लॅटमध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट

दोन आरोपींना अटक : दिल्ली-मुंबईतील युवती सापडल्या
नागपूर : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने कोराडीतील एका अपार्टमेंटमध्ये सुरू असलेला देह व्यापाराच्या ‘हाय प्रोफाईल’ अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांनी या अड्ड्यावरून दिल्ली-मुंबईतील युवतींना पकडले आहे. इंटरनेटवर ‘एस्कॉर्ट सर्व्हिस’च्या नावाने हा व्यवसाय सुरू होता.
पोलिसांनी हा अड्डा चालविणारी मुख्य आरोपी निशा ऊर्फ पूजा प्रीतम दहिकर (२८) रा. इंदोरा झोपडपट्टी आणि तिचा साथीदार मंत शामलाल टेंगुरिया (२९) रा. इंदोर मध्यप्रदेश यास अटक केली आहे. निशा दहिकर पूजा आणि सीमासह अनेक नावांनी देह व्यापारात ओळखल्या जाते. ती ‘नागपूर एस्कॉर्ट सर्व्हिस’ नावाने आॅनलाईन सेक्स रॅकेट चालवित होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी बनावट ग्राहकांच्या माध्यमातून संपर्क साधला. निशाने आपले नाव माया सांगितले. तिने ग्राहकाला मानकापूरच्या आयकॉन अपार्टमेंटमधील फ्लॅट क्रमांक २०२ येथे बोलविले. पोलिसांनी बनावट ग्राहकाला तेथे पाठविले. निशाने दोन हजारात युवतीचा सौदा करून पैसे घेताच पोलिसांनी धाड टाकून तिला मंत टेंगुरियासह अटक केली. फ्लॅटमध्ये दोन युवती आढळल्या. यातील एक दिल्लीची तर दुसरी मुंबईची रहिवासी आहे. दोघीही अनेक दिवसांपासून देह व्यापारात गुंतल्या आहेत.
पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कामाचे कारण सांगून येथे बोलविल्याचे त्यांनी सांगितले. मुंबईची युवती मंगळवारी तर दिल्लीची युवती आजच येथे आली. मुंबईची युवती हैदराबाद येथील काम संपल्यानंतर येथे आली. दोघीही एक, दोन आठवड्यासाठी एखाद्या शहरात जातात. त्यांच्याजवळ दलालांचे नेटवर्क आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांना वर्षभर काम मिळते. देहव्यापारात मोठी कमाई होत असल्यामुळे दोघीही विमानाने प्रवास करतात. निशा अनेक दिवसांपासून देह व्यापारात आहे. दीड वर्षापुर्वी तिच्या पतीला देह व्यापारात अटक झाली होती. सध्या तो आॅटो चालवितो. देह व्यापाराचा अनुभव असल्यामुळे निशाने युवतींना येथे बोलविले. मंत हा ‘मेक अप’ करण्याचे काम करतो. निशाजवळ ग्राहकांची संख्या मोठी आहे.
तपासात तिच्यापासून अनेक महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
पोलीस फ्लॅट मालकाचाही शोध घेत आहेत. ही कारवाई अप्पर आयुक्त रंजन कुमार शर्मा, उपायुक्त राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी. सी. सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक जयपूरकर, उपनिरीक्षक इंगोले, गोपाळ वैद्य, योगेश घोडकी, मनोज सिंह चव्हाण, अजय घाटोळे, संजय पांडे, सुरेखा सांडेकर, साधना चव्हाण यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: High profile sex racket in flat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.