फुटाळा तलाव विकासाला स्थगिती देण्याची मागणी, उच्च न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: June 28, 2023 05:38 PM2023-06-28T17:38:01+5:302023-06-28T17:38:41+5:30

पर्यावरण संवर्धनाकरिता कार्य करणाऱ्या स्वच्छ असोसिएशनने या प्रकल्पाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे.

High Court reserved decision, seeking stay on Futala Lake development | फुटाळा तलाव विकासाला स्थगिती देण्याची मागणी, उच्च न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला

फुटाळा तलाव विकासाला स्थगिती देण्याची मागणी, उच्च न्यायालयाने निर्णय राखिव ठेवला

googlenewsNext

नागपूर :फुटाळा तलाव म्युझिकल फाउंटन शो प्रकल्पांतर्गत प्रस्तावित तरंगते रेस्टॉरंट, पार्किंग प्लाझा इत्यादी नवीन बांधकामांना तात्पुरती स्थगिती देण्याच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी निर्णय राखिव ठेवला.

पर्यावरण संवर्धनाकरिता कार्य करणाऱ्या स्वच्छ असोसिएशनने या प्रकल्पाविरुद्ध जनहित याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तिद्वय अतुल चांदूरकर व वृषाली जोशी यांच्यासमक्ष सुनावणी झाली. फुटाळा तलावाची नॅशनल वेटलॅण्ड इन्व्हेंटरी ॲण्ड ॲसेसमेंटमध्ये नोंद आहे. सर्वोच्च व उच्च न्यायालयाने विविध प्रकरणांत दिलेल्या आदेशानुसार, केंद्र सरकारद्वारे पाणथळ स्थळाचा दर्जा देण्यात आलेल्या जलाशयाच्या परिसरात कोणतेही बांधकाम करता येत नाही.

याशिवाय, पर्यावरण, वने व वातावरणीय बदल मंत्रालयाने पाणथळ स्थळाच्या संरक्षणाकरिता ८ मार्च २०२२ रोजी निर्देश जारी केले आहेत. असे असताना फुटाळा तलाव व परिसरात वादग्रस्त प्रकल्प उभारला जात आहे. त्यामुळे हा प्रकल्प अवैध ठरवून रद्द करण्यात यावा, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे ॲड. सत्यजीत राजेशिर्के व ॲड. कैलाश नरवाडे यांनी कामकाज पाहिले

Web Title: High Court reserved decision, seeking stay on Futala Lake development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.