शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार उघड्या चेंबरच्या गंभीरतेवरून हायकोर्टाने महापालिकेला फटकारले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:50 IST

Nagpur : 'लोकमत'च्या बातमीची हायकोर्टाने दाखल करून घेतली जनहित याचिका, प्रशासनाचा आंधळेपणा आणला रडारवर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरामध्ये सांडपाणी व मलवाहिन्यांचे दहा हजारांहून अधिक चैंबर उघडे आहेत, अशी बातमी 'लोकमत'ने ३० जुलै रोजी प्रकाशित केली होती. त्यामुळे महापालिकेचा आंधळेपणा उच्च न्यायालयाच्या रडारवर आला. मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने गुरुवारी त्या बातमीची गंभीर दखल घेऊन यासंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करून घेतली.

लोखंडी झाकणे चोरीला गेल्यामुळे आणि सिमेंटची झाकणे तुटल्यामुळे चेंबर उघडे आहेत. हे चेंबर मृत्यूचे सापळे बनले आहेत. पावसाळ्यात पाणी साचल्यानंतर उघडे चेंबर दिसत नाही. त्यामुळे नागरिक व प्राण्यांचे अपघात होतात. परिणामी, अपघातग्रस्तांना अनेकदा गंभीर इजा होऊन अपंगत्व येते. काही घटनांमध्ये त्यांना प्राणही गमवावे लागले आहेत. मात्र, महानगरपालिका याबाबत उदासीन आहे. उघड्या चेंबरवर झाकणे लावण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. उघड्चा चेंबरवर फायबर मिक्स व एसएफआरसी झाकणे बसवण्याचा निर्णय कागदावरच आहे. मनपाने उघड्या चैंबरवर झाकणे बसविण्यासाठी १५ कोटींयांची तरतूद होती. एप्रिलमध्ये निविदा झाली. परंतु, कामेच झाली नाही. 

खुल्या विहिरीमुळे मुलगा गमावलाकामगार नगर येथील आशा भगत यांनी ऑटोमोटिव्ह चौक ते कामठी रोडवरील नूरी मशिदीजवळच्या खुल्या विहिरीमुळे कमावता मुलगा गमावला. ही घटना ४ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री १० व्या सुमारास घडली. त्यांच्या मुलाचे नाव प्रशांत होते. तो महालेखा कार्यालयात लिपिक होता. पीडित आईने मनपाकडून नुकसानभरपाई मिळवण्यासाठी अॅड. शिल्पा गिरटकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ती याचिका या नवीन जनहित याचिकेसोबत जोडली आहे.

अॅड. शिल्पा गिरटकर न्यायालय मित्रन्यायालयाने या जनहित याचिकेचे कामकाज पाहण्यासाठी अनुभवी अॅड. शिल्पा गिरटकर यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती केली आहे. नियमानुसार जनहित याचिका तयार करण्यासाठी त्यांना दोन आठवड्यांचा वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर याचिकेवर पुढील कार्यवाही केली जाईल. 

टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालय