शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाचा निर्णय : हद्दपारीचे क्षेत्र मोठे असू शकते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 00:21 IST

गुन्हे विशिष्ट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रापुरते मर्यादित असले तरी, गुन्हेगाराला शहर, जिल्हा किंवा त्यापेक्षाही मोठ्या क्षेत्रातून हद्दपार करता येते. पण असा निर्णय घेण्यासाठी प्राधिकाऱ्याकडे समाधानकारक पुरावे असणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या पूर्ण न्यायपीठाने नुकताच दिला. गुन्हेगाराला कारणे दाखवा नोटीस बजावताना, त्यात कॅमेऱ्यापुढील बयानाची विस्तृत माहिती देणे आवश्यक नाही, असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.

ठळक मुद्देकॅमेऱ्यापुढील बयानाची विस्तृत माहिती आवश्यक नाही

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे विशिष्ट पोलीस ठाण्याच्या क्षेत्रापुरते मर्यादित असले तरी, गुन्हेगाराला शहर, जिल्हा किंवा त्यापेक्षाही मोठ्या क्षेत्रातून हद्दपार करता येते. पण असा निर्णय घेण्यासाठी प्राधिकाऱ्याकडे समाधानकारक पुरावे असणे आवश्यक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या पूर्ण न्यायपीठाने नुकताच दिला. गुन्हेगाराला कारणे दाखवा नोटीस बजावताना, त्यात कॅमेऱ्यापुढील बयानाची विस्तृत माहिती देणे आवश्यक नाही, असेही या निर्णयात स्पष्ट करण्यात आले.पूर्णपीठात न्या. प्रदीप देशमुख, न्या. सुनील शुक्रे व न्या. झेड. ए. हक यांचा समावेश होता. उच्च न्यायालयाने ‘पप्पू मिश्रा’ या प्रकरणात एखाद्या गुन्हेगाराने विशिष्ट पोलीस ठाण्याच्या हद्दीतच गुन्हे केले असल्यास, त्याला शहर किंवा जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी ठोस पुरावे आवश्यक आहेत व त्या पुराव्यांचा हद्दपारीच्या आदेशात उल्लेख असला पाहिजे, असे म्हटले होते. या निर्णयाचा आधार घेऊन सुमित मरसकोल्हे व इतर काही गुन्हेगारांनी स्वत:च्या हद्दपारीच्या आदेशांना उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. परंतु, न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी ‘पप्पू मिश्रा’ प्रकरणातील निर्णयाच्या आधारावर या गुन्हेगारांना दिलासा देण्यास नकार दिला व यासंदर्भात पूर्ण न्यायपीठाकडून योग्य खुलासा होण्यासाठी हे प्रकरण मुख्य न्यायमूर्तींकडे पाठविले होते. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. रजनीश व्यास, अ‍ॅड. जेमिनी कासट व अ‍ॅड. एल. हुसैन तर, सरकारतर्फे अ‍ॅड. मेहरोज खान पठाण यांनी बाजू मांडली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे