शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

हायकोर्टाचा निर्णय : मनपातील १२ ग्रंथालय सहायकांची बडतर्फी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2020 00:06 IST

महानगरपालिकेतील १२ ग्रंथालय सहायकांना बडतर्फ करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. या ग्रंथालय सहायकांना अवैधपणे पुनर्नियुक्ती देण्यात आली, असे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देपुनर्नियुक्ती मिळण्याचा अधिकार नसल्याचे निरीक्षण

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेतील १२ ग्रंथालय सहायकांना बडतर्फ करण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कायम ठेवला. या ग्रंथालय सहायकांना अवैधपणे पुनर्नियुक्ती देण्यात आली, असे निरीक्षण निर्णयात नोंदविण्यात आले. न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांनी हा निर्णय दिला.महापालिका आयुक्तांनी ५ जून २०२० रोजी संबंधित आदेश जारी केला. त्याला ग्रंथालय सहायक सुभाष घाटे व इतरांनी आव्हान दिले होते. न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन ग्रंथालय सहायकांची याचिका फेटाळून लावली. महानगरपालिकेने ३२ विविध संवर्गातील १६१ पदे भरण्याकरिता १ सप्टेंबर १९९३ रोजी जाहिरात दिली होती. त्या पदांकरिता ४०९० अर्ज सादर झाले होते. निवड समितीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून ८ फेब्रुवारी १९९४ रोजी १५२ उमेदवारांची निवड यादी तर, २०७ उमेदवारांची प्रतीक्षा यादी जाहीर केली होती. दरम्यान, या पदभरतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशावरून मनपा उपायुक्त अडतानी यांच्या समितीने चौकशी केली व नियुक्त्यांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा अहवाल १८ जून २००१ रोजी सादर केला. त्यानंतर ३० जानेवारी २००२ रोजी याचिकाकर्त्यांसह १०६ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले. पुढे सरकारच्या हस्तक्षेपामुळे सर्व कर्मचाऱ्यांना सेवेत परत घेण्यात आले. याचिकाकर्त्यांना १२ फेब्रुवारी २०१८ रोजीच्या शासन आदेशानुसार मानवतेच्या दृष्टिकोनातून ग्रंथालय सहायकपदी पुनर्नियुक्ती देण्यात आली होती. दरम्यान, मनपा आयुक्तांनी त्यांना १२ मे २०२० रोजी बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावली आणि सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर नियुक्त्या अवैध ठरवून संबंधित आदेशाद्वारे सर्वांना बडतर्फ केले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाlibraryवाचनालयsuspensionनिलंबन