शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
2
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
3
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
4
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
5
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
6
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत
7
Hyundai IPO: दिग्गज कार कंपनी आणणार देशातील सर्वात मोठा IPO, लिस्टिंगचा आहे प्लान
8
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
9
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
10
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
11
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
12
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
13
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
14
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
15
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
16
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
18
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
19
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
20
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या

हायकोर्ट : नगरसेवकांनो ! मोकाट जनावरे आवरण्यासाठी प्रयत्न करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2018 10:45 PM

शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनीही गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. तसेच, यासंदर्भात महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक काय उपाययोजना करीत आहेत अशी विचारणा करून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.

ठळक मुद्देउपाययोजनांची मागितली माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील मोकाट जनावरांची समस्या सोडविण्यासाठी नगरसेवकांनीही गांभीर्याने प्रयत्न करायला हवेत असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी नोंदवले. तसेच, यासंदर्भात महानगरपालिका अधिकारी व नगरसेवक काय उपाययोजना करीत आहेत अशी विचारणा करून यावर उत्तर सादर करण्याचा आदेश दिला.संबंधित प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व मुरलीधर गिरटकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, दुग्ध विकास विभागाने आतापर्यंत शहरातील ७८६ जनावरांचे ‘टॅगिंग’ करण्यात आल्याची माहिती दिली. ‘टॅगिंग’मुळे संबंधित जनावर कुणाच्या मालकीचे आहे हे समजून येईल व ते जनावर मोकाट आढळून आल्यास मालकावर कायद्यानुसार कारवाई करता येईल. विभागाने केलेल्या सर्वेक्षणामध्ये शहरात ५६९ अवैध गोठे आढळून आले होते. त्यांच्यावर कायद्यानुसार कारवाई केली जात आहे. अवैध गोठ्यांमुळे त्या-त्या परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. मोकाट जनावरांचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. दूध काढणे झाल्यानंतर जनावरांना मोकाट सोडले जाते. त्यामुळे जनावरे रोडवर जाऊन बसतात. त्यातून वाहतूक कोंडी होते. अपघात घडतात. यासह अन्य विविध मुद्यांविषयी न्यायालयात जनहित याचिका प्रलंबित आहे. या याचिकेत दुग्ध विकास अधिकाऱ्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. न्यायालयाने त्यांना नोटीस बजावून यावर उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणात अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर न्यायालय मित्र आहेत.वाहतूक नियम तोडणाऱ्यांकडून अतिरिक्त दंड वसूल करावारंवार वाहतूक नियम तोडणाऱ्यांकडून अतिरिक्त दंड वसूल करण्यात यावा व त्या दंडाची रक्कम सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यासह अन्य आवश्यक बाबींवर खर्च करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिलेत. न्यायालयाने दारू पिऊन वाहन चालविण्याचा मुद्दाही हाताळला. सध्याच्या नियमानुसार, अशा प्रकरणात पहिल्यांदा ३०००, दुसऱ्यांदा २५०० तर, तिसºयांदा २००० रुपये दंड आकारला जात असल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. तसेच, हा दंड वाढविणे आवश्यक आहे याकडे न्यायालयाचे लक्ष वेधण्यात आले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने सरकारला यासंदर्भातील नियम रेकॉर्डवर आणण्यास सांगितले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका