शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना हायकोर्टाची अवमानना नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 11:47 AM

High court Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांना अवमानना नोटीस बजावली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनुसूचित जमातीचे वैधता प्रमाणपत्र सादर करण्यात अपयशी ठरलेल्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्यामुळे, राज्य सरकारविरुद्ध उच्च न्यायालयामध्ये शेकडो याचिका दाखल झाल्या आहेत. अशाच एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व नितीन सूर्यवंशी यांनी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजीव जलोटा यांना अवमानना नोटीस बजावली.पुणेतील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यरत प्राध्यापक नामदेव हेडाऊ यांनी जलोटा यांच्याविरुद्ध अवमानना याचिका दाखल केली आहे. जलोटा यांना सदर याचिकेवर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ६ जुलै २०१७ रोजी सर्वोच्च न्यायालयाने जगदीश बहिरा प्रकरणामध्ये जात वैधता प्रमाणपत्राचा दावा अवैध ठरलेल्या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम ठेवले जाऊ शकत नाही, असा निर्णय दिला आहे.

त्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने २१ डिसेंबर २०१९ रोजी जीआर जारी करून, अनुसूचित जमातीच्या वैधता प्रमाणपत्राचा दावा अवैध ठरलेल्या सर्वच कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग केले आहे. अशा कर्मचाऱ्यांची सेवा ११ महिन्यानंतर आपोआप समाप्त होणार आहे. परंतु, अनेक कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सरकारने चुकीचा निर्णय घेतल्याचा आरोप हेडाऊ यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ६ जुलै २०१७ पूर्वी सेवेला संरक्षण मिळालेल्या कर्मचाऱ्यांना लागू होत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. हेडाऊ यांच्या सेवेला ६ जुलै २०१७ पूर्वी उच्च न्यायालयाकडून संरक्षण मिळाले आहे. असे असताना त्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आल्यामुळे उच्च न्यायालयाचा अवमान झाला. त्याकरिता सरकारवर अवमानना कारवाई करण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. हेडाऊतर्फे  ऍड. शैलेश नारनवरे यांनी कामकाज पाहिले.

 

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय