हायकोर्ट बार असोसिएशन निवडणूक पुन्हा लांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 23:43 IST2021-03-19T23:42:35+5:302021-03-19T23:43:52+5:30
High Court Bar Association election postponed कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरची निवडणूक पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवडणूक १७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल, असे निवडणूक समितीने शुक्रवारी जाहीर केले.

हायकोर्ट बार असोसिएशन निवडणूक पुन्हा लांबली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे हायकोर्ट बार असोसिएशन (एचसीबीए) नागपूरची निवडणूक पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही निवडणूक १७ एप्रिल रोजी सकाळी ९.३० ते सायंकाळी ५ या वेळेत होईल, असे निवडणूक समितीने शुक्रवारी जाहीर केले.
ही निवडणूक गेल्या वर्षी मार्चमध्ये होणार होती. दरम्यान, कोरोनामुळे लॉकडाऊन लागू झाल्यानंतर संपूर्ण कार्यक्रम रद्द करून निवडणूक पुढे ढकलण्यात आली. यावर्षी गेल्या फेब्रुवारीमध्ये नवीन कार्यक्रम जाहीर करून निवडणुकीसाठी १२ मार्च तारीख निर्धारित करण्यात आली होती. परंतु, कोरोनाचे वाढते रुग्ण व प्रशासनाने लागू केलेले निर्बंध लक्षात घेता, निवडणूक पुढे ढकलून २५ मार्चला ठेवण्यात आली होती. आता वर्तमान परिस्थिती पाहता निवडणुकीसाठी १७ एप्रिल ही तारीख देण्यात आली आहे. असे करताना ३ मार्चपर्यंत पूर्ण झालेला निवडणूक कार्यक्रम कायम ठेवण्यात आला आहे.