हायकोर्टात न्यायमूर्तींची २५ पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 22:46 IST2018-05-16T22:46:41+5:302018-05-16T22:46:53+5:30

मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्तमान परिस्थितीत न्यायमूर्तींची एकूण २५ पदे रिक्त आहेत. त्यात कायम न्यायमूर्तींच्या १६ तर, अतिरिक्त न्यायमूर्तींच्या ९ पदांचा समावेश आहे.

In High court 25 posts vacant of judges | हायकोर्टात न्यायमूर्तींची २५ पदे रिक्त

हायकोर्टात न्यायमूर्तींची २५ पदे रिक्त

ठळक मुद्देएकूण ९४ पदे मंजूर : सध्या ६९ न्यायमूर्तीच कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयामध्ये वर्तमान परिस्थितीत न्यायमूर्तींची एकूण २५ पदे रिक्त आहेत. त्यात कायम न्यायमूर्तींच्या १६ तर, अतिरिक्त न्यायमूर्तींच्या ९ पदांचा समावेश आहे.
या न्यायालयाला कायम न्यायमूर्तींची ७१ व अतिरिक्त न्यायमूर्तींची २३ अशी एकूण ९४ पदे मंजूर आहेत. सध्या ५५ कायम व १४ अतिरिक्त न्यायमूर्ती कार्यरत आहेत. विधिज्ञांची सुरुवातीला दोन वर्षांसाठी अतिरिक्त न्यायमूर्तिपदी नियुक्ती केली जाते. त्यानंतर या काळातील कार्यकुशलता लक्षात घेऊन त्यांना कायम केले जाते. सध्या कार्यरत कायम न्यायमूर्तींमध्ये न्या. विजया तहिलरामानी, न्या. एन. एच. पाटील, न्या. एस. एस. केमकर, न्या. ए. एस. ओका, न्या. एस. सी. धर्माधिकारी, न्या. बी. आर. गवई, न्या. बी. पी. धर्माधिकारी, न्या. आर. एम. बोरडे, न्या. आर. व्ही. मोरे, न्या. आर. एम. सावंत, न्या. ए. ए. सय्यद, न्या. एस. एस. शिंदे, न्या. के. के. तातेड, न्या. पी. बी. वराळे, न्या. एस. जे. काथावाला, न्या. मृदुला भटकर, न्या. आर. जी. केतकर, न्या. आर. के. देशपांडे, न्या. एस. व्ही. गंगापुरवाला, न्या. टी. व्ही. नलावडे, न्या. एम. एस. संकलेचा, न्या. आर. डी. धनुका, न्या. एस. पी. देशमुख, न्या. एन. एम. जामदार, न्या. साधना जाधव, न्या. पी. एन. देशमुख, न्या. एस. बी. शुक्रे, न्या. एस. सी. गुप्ते, न्या. झेड. ए. हक, न्या. के. आर. श्रीराम, न्या. जी. एस. पटेल, न्या. ए. एस. चांदुरकर, न्या. रेवती मोहिते-डेरे, न्या. एम. एस. सोनक, न्या. आर. व्ही. घुगे, न्या. व्ही. एल. अचलिया, न्या. व्ही. एम. देशपांडे, न्या. ए. एस. गडकरी, न्या. नितीन सांबरे, न्या. जी. एस. कुलकर्णी, न्या. बी. पी. कोलाबावाला, न्या. ए. के. मेनन, न्या. सी. व्ही. भडंग, न्या. व्ही. के. जाधव, न्या. ए. एम. बदर, न्या. पी. आर. बोरा, न्या. अनुजा प्रभुदेसाई, न्या. के. एल. वडाणे, न्या. डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी, न्या. पी. डी. नाईक, न्या. एम. एस. कर्णिक, न्या. स्वप्ना जोशी, न्या. के. के. सोनवने, न्या. संगीतराव पाटील व न्या. नूतन सरदेसाई यांचा समावेश आहे.
न्या. एस. के. शिंदे, न्या. आर. बी. देव, न्या. भारती डांगरे, न्या. एस. व्ही. कोतवाल, न्या. आर. आय. छागला, न्या. मनीष पितळे, न्या. एस. के. कोतवाल, न्या. ए. डी. उपाध्ये, न्या. एम. एस. पाटील, न्या. ए. एम. ढवळे, न्या. पी. के. चव्हाण, न्या. एम. जी. गिरटकर, न्या. विभा कंकणवादी व न्या. एस. एम. गव्हाणे हे अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून कार्यरत आहेत.

 

Web Title: In High court 25 posts vacant of judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.