होळीला वनक्षेत्रात ‘हाय अलर्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:36 AM2019-03-20T11:36:58+5:302019-03-20T11:37:21+5:30

वन विभागाच्या प्रादेशिक विभागात येणाऱ्या चार जिल्ह्यात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा वनक्षेत्रात होळीच्या पार्श्वभूमीवर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.

'High alert' in Holi forest area | होळीला वनक्षेत्रात ‘हाय अलर्ट’

होळीला वनक्षेत्रात ‘हाय अलर्ट’

Next
ठळक मुद्देवन विभागाच्या व्हिजिलन्सचे विभागस्तरावर निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वन विभागाच्या प्रादेशिक विभागात येणाऱ्या चार जिल्ह्यात नागपूर, भंडारा, गोंदिया आणि वर्धा वनक्षेत्रात होळीच्या पार्श्वभूमीवर ‘हाय अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
होळी दहनानिमित्त नेहमीच जवळच्या वनक्षेत्रात वृक्षांची अवैध कटाईची शक्यता वाढते. यासोबतच होळी व पाडव्यासाठी लहान-लहान वन्यप्राण्यांच्या शिकारीची शंका राहते. अशा स्थितीचा सामना करण्यासाठी विशेषत्वाने होळीला वनक्षेत्रात तैनात वन कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात येतात. या संबंधात प्रादेशिक वन विभाग कार्यालयाचे उपविभागीय वनाधिकारी (व्हिजिलन्स) एस. के. त्रिपाठी यांनी नागपूर जिल्ह्याच्या तालुक्यातील वन परिक्षेत्रासह भंडारा, गोंदिया आणि वर्धाच्या वन परिक्षेत्र अधिकाºयांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक वन परिक्षेत्र स्तरावर लक्ष देण्यासाठी एक पथक गस्त घालणार आहे.
यासोबतच मोबाईल स्क्वॉड आणि व्हिजिलन्स विभागाचे पथक जिल्ह्यांची गस्त घालतील. यात संवेदनशील भागांची यादी तयार करण्यात आली आहे. या क्षेत्रात विशेष करून पथकांना लक्ष देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पथक करणार तपासणी
विभागीय वनाधिकारी एस.के. त्रिपाठी (व्हिजिलन्स) यांनी सांगितले की, होळीचा सण पाहून आठवडाभरापूर्वी प्रत्येक रेंज कार्यालयांना पत्र पाठवून सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच व्हिजिलन्सचे भरारी पथक अचानक कोणत्याही भागात जाऊन तपासणी करणार आहे.

Web Title: 'High alert' in Holi forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Holiहोळी