शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

अहो हे, बसस्थानक की दुचाकींचे वाहनतळ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 22:32 IST

जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुका मुख्यालयी बसस्थानक आहे. तेथून तालुक्यातील गावा-गावांत एसटी बसफेऱ्या होतात. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. मात्र या बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना वाहनांच्या पार्किंगमुळे त्रासाचा सामना करावा लागतो. परिणामी जिथे जागा मिळेल, तिथे वाहन उभे करून त्यांना बाहेरगावी जावे लागते.

ठळक मुद्देप्रवाशांची वाहने अस्ताव्यस्त : नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर, रामटेकसह सर्वच बसस्थानकाचे वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: जिल्ह्यातील बहुतांश सर्वच तालुका मुख्यालयी बसस्थानक आहे. तेथून तालुक्यातील गावा-गावांत एसटी बसफेऱ्या होतात. त्यासोबतच जिल्हा मुख्यालयाशीही ‘कनेक्टिव्हिटी’ आहे. मात्र या बसस्थानकावर बाहेरगावी जाण्यासाठी आलेल्या प्रवाशांना वाहनांच्या पार्किंगमुळे त्रासाचा सामना करावा लागतो. परिणामी जिथे जागा मिळेल, तिथे वाहन उभे करून त्यांना बाहेरगावी जावे लागते. परत आल्यावर मात्र ते वाहन सुस्थितीत असेलच याची खात्री नसते. जिल्ह्यातील कळमेश्वर, रामटेक, सावनेर, उमरेड, कामठी, पारशिवनी, नरखेडच नव्हे तर सर्वच बसस्थानकात अशीच स्थिती आहे. याकडे एसटी महामंडळ कधी लक्ष देणार, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.कळमेश्वर बसस्थानक परिसरात दिवसभर मोटरसायकलसह कारचे अवैधपणे  पार्किंग केले जाते. ही वाहने मिळेल तिथे लावली जात असल्याने बसचालकांनाही बऱ्याचदा त्रास सहन करावा लागतो. येथे पार्किंगचे कंत्राट एखाद्याला दिल्यास वाहने सुस्थितीत असू शकतात. सोबतच त्या कंत्राटामुळे एसटी महामंडळालाही आर्थिक हातभार लागू शकतो. कळमेश्वर येथून दररोज नागपूर, काटोल, नरखेड, सावनेर येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोच्या घरात आहे. सोबतच विद्यार्थीही बाहेरगावी शिकायला जातात. त्या सर्वांची वाहने बसस्थानक आवारात बेवारस असतात. ही वाहने चोरी जाण्याचीही शक्यता अधिक असते. याकडे एसटी महामंडळानेच लक्ष देण्याची गरज आहे.असेच चित्र रामटेक बसस्थानक येथेही आहे. येथून दररोज नागपूर, कामठी, कन्हान, देवलापार, भंडारा, पारशिवनी, मौदा, तुमसर येथे प्रवासी ये-जा करतात. त्या सर्वांची वाहने बसस्थानकाच्या आवारात अस्ताव्यस्त असतात. एवढेच काय तर आजूबाजूच्या गावातील नागरिकांना रामटेक येथून बाहेरगावी जायचे असल्यास ते आपली दुचाकी रामटेक बसस्थानक परिसरात ठेवतात. सायंकाळी परत आल्यावर आपल्या वाहनाने गावाकडे जातात. परिणामी अवैधपणे पार्किंग करणाऱ्या वाहनांची संख्या रामटेक येथे अधिक आहे.पार्किंगसाठी ओळखीचा आधारबसस्थानकावर वाहनांचे पार्किंग स्टॅन्ड नसल्याने बाहेरगावी जाणाऱ्या  प्रवाशांची अडचण होते. त्यामुळे जागा मिळेल तिथे वाहन उभे करून नागरिक पुढच्या प्रवासाला निघतात. काही जण आपल्या ओळखीच्या व्यक्तीकडे वाहन पार्क करतात. एवढेच काय तर बसस्थानकापुढे असलेल्या पानटपरी, दुकानदाराशीही ओळखी वाढविली जाऊन त्याच्या दुकानासमोर अशी वाहने उभी असतात. मात्र परत येईपर्यंत ते वाहन सुस्थितीत असेलच याची खात्री नसते.

टॅग्स :nagpurनागपूरRural Developmentग्रामीण विकास