शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

हे बाप्पा मोरया, आतातरी पावशील का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2020 01:03 IST

बाजारात निराशेचा अंधार पसरला आहे आणि मूर्तिकार रडवेल्या चेहऱ्याने बाप्पा मोरयाकडे हे विघ्न दूर करण्याची प्रार्थना करत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्रीगणरायाच्या आगमनाला यंदा कोरोना नावाच्या सूक्ष्मरूपी राक्षसाने विळखा घातलाय. संसर्गाच्या दहशतीमुळे यंदा उत्सव नकोच, असे समाजहिताचे आवाहन शासन-प्रशासनाकडून केले जातेय. या आवाहनासोबतच मूर्तींची उंचीही कमी करण्याचे ऑर्डरही पारित झाले. त्याचा परिणाम म्हणून मूर्तिकारांचा धंदा चौपट झाला आहे. बाजारात निराशेचा अंधार पसरला आहे आणि मूर्तिकार रडवेल्या चेहऱ्याने बाप्पा मोरयाकडे हे विघ्न दूर करण्याची प्रार्थना करत आहेत.भारतीय संस्कृतीत अग्रपूजेचा मान असलेल्या श्रीगणरायाचे आगमन धडाक्यात होत असते. या उत्सवाच्या भरवशावर हजारो कोटींची उलाढाल संपूर्ण महाराष्ट्रात होत असते. या उत्सवाच्या निमित्ताने अनेकांच्या वर्षभराच्या अर्थनियोजनाचे गणित पार पडत असल्याने धार्मिक अनुष्ठानासोबतच व्यावसायिक सोपस्काराला अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यात मूर्तिकार हा प्रमुख असतो. त्याच्याच कल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या मूर्तीत भाविक आपल्या आराध्याला मनोभावे दंडवत घालत असतो. मात्र, कोरोनाच्या संसर्गाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे दिसत नसल्याच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासनाने भाविकांना यंदा उत्सव नको म्हणण्यास सुरुवात केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मूर्तींची उंची चार फुटापर्यंत मर्यादित करण्यात आली आहे. त्याचा दुष्परिणाम म्हणजे मूर्तिकारांनी आधीच चार फुटांपेक्षा उंच घडविलेल्या मूर्ती निकामी ठरणार आहेत. यामुळे मूर्तिकारांनी केलेली आर्थिक गुंतवणूक, केलेली मेहनत वाया जाणार आहे. निर्णय समाजहिताचाच असला तरी आर्थिक गणित कोलमडल्याने मूर्तिकारांच्या चेहºयावरील रया गेली आहे. एरवी श्रीगणेशोत्सवाच्या तयारीने मूर्तिकारांची प्रमुख बाजारपेठ असलेल्या चितारओळीत जल्लोष, उत्साह, चैतन्य ओसंडून वाहत असायचे. तीच चितारओळ शांत असल्याचे दिसून येते. कधीकाळी येथे शिरताच जिकडे पहावे तिकडे मोठमोठाल्या नयनरम्य मूर्ती मनाचे ठोके चुकवत असत. आज त्याच गल्ल्या सताड उघड्या असल्याचे नजरेस पडते. ऑर्डर्स नसल्याने ना कुठली लगबग ना कुठला आवाज कानावर पडतो, अशी दैनावस्था नजरेस पडते. मोठ्या मंडळांना यंदा उत्सव करण्यास मनाई असल्याने मूर्तिकारांकडे आॅर्डर्स नाहीत. मात्र, लहान मूर्तींचीही तीच दैनावस्था. त्याचा परिणाम गेल्या वर्षीच्या तुलनेत ७० टक्क्यांनी मूर्तींची निर्मिती घटल्याने मूर्तिकारांकडे असलेले कामगारही घरीच बसले आहेत.भाडेकरूंमुळे होणार गडबडचितारओळीत दरवर्षी बाहेरून येणारे मूर्तीविक्रेते खोली भाड्याने घेऊन व्यवहार करत असतात. चितारओळीतील घरमालकही यंदा कमी काळात मोठी रक्कम मिळणार म्हणून उत्सुक आहेत. मात्र, याला येथील मूर्तिकारांचा विरोध होत आहे. हे भाडेकरू कुठून येतील, हे सांगता येत नाही. सगळीकडेच कोरोनाचा शिरकाव झालेला आहे. अशा स्थितीत या भाडेकरूंना वेगळ्या स्थानावर मनपाने स्टॉल्स द्यावे आणि आम्हा स्थानिकांनाच येथे मूर्तीविक्रीचा व्यवसाय करण्याची परवानगी द्यावी, अशी भावना मूर्तिकार व्यक्त करत आहेत. या स्थितीमुळे येत्या काळात येथे मोठी गडबड होण्याची शक्यता आहे.नागपूरचा राजा’ पॅकबंदरेशीमबागेत दरवर्षी श्रीगणेशोत्सवात विराजमान होणारा ‘नागपूरचा राजा’ पॅकबंद अवस्थेत आहे. २ जूनपर्यंत या मूर्तीचे काम पूर्ण झाले. केवळ रंगरंगोटी व साजसज्जा चढविण्याचे काम राहिले होते. मात्र, चार फूट उंच मूर्तीची मर्यादा सांगण्यात आल्याने नागपूरच्या राजाला पॉलिथीन गुंडाळून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे यंदा नागपूरचा राजा विराजमान होणार की नाही, ही शंका निर्माण झाली आहे.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवnagpurनागपूर