शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

कोंबडीने वाढवला वाद : तलवार चालली, एक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 21:56 IST

कोंबडीने एकाच्या घरात शिरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद वाढवला. हा वाद एवढा विकोपाला गेला की एकाने दुसऱ्यावर तलवारीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.

ठळक मुद्देनागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोंबडीने एकाच्या घरात शिरून दोन शेजाऱ्यांमध्ये वाद वाढवला. हा वाद एवढा विकोपाला गेला की एकाने दुसऱ्यावर तलवारीने हल्ला चढवून त्याला गंभीर जखमी केले. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली.समतानगरातील उन्नती कॉलनीत राजेंद्र रमाशंकर यादव (वय ४२) आणि मुन्ना कटरे आजूबाजूला राहतात. त्यांच्यात छोट्या छोट्या कारणावरून कुरबूर सुरू राहते. रविवारी सकाळी ९ च्या सुमारास आरोपी मुन्नाची कोंबडी यादवच्या घरात शिरली. यादवने तिला हुसकावून लावले. त्यामुळे मुन्ना कटरे, त्याची पत्नी आणि दोन मुली घराबाहेर आल्या. कोंबडीला पळवून का लावले, असे विचारत त्यांनी यादवसोबत वाद घातला. वाद वाढत गेला आणि आरोपी मुन्नाने तलवार काढून यादववर हल्ला चढवला. त्याच्या डोक्यावर, हातावर जोरदार वार केले. या हल्ल्यात यादव गंभीर जखमी झाला. आरडाओरड ऐकून आजूबाजूची मंडळी धावली. त्यांनी आरोपी कटरेला कसेबसे आवरले. जखमी यादवला डॉक्टरकडे नेण्यात आले. जरीपटका पोलिसांना माहिती कळविण्यात आली. पोलिसांनी यादव यांची तक्रार नोंदवून घेत आरोपी मुन्ना कटरे, त्याची पत्नी आणि दोन मुलीविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर